उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदाराच्या अटकेचे हायकोर्टाचे आदेश

उत्तरप्रदेशातील योगी सरकारला धक्का


न्यायालयाच्या देखरेखेखाली होणार तपास

लखनौ – उन्नाव येथील भाजप आमदार कुलदीपसिंह सेनगर यांच्या अटकेचे आदेश आज अलाहाबाद उच्च न्यायलयाने दिले आहेत. एका सोळा वर्षीय मुलीवर गेल्यावर्षी बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. देशभरातून या प्रकरणाची चर्चा सुरू असताना उत्तरप्रदेशातील योगी अदित्यनाथ यांच्या सरकारने मात्र त्यांना अटक करणे टाळले होंते पण आता न्यायालयानेच यात हस्तक्षेप करून त्यांच्या अटकेचे आदेश दिल्याने योगी सरकारला मोठा दणका बसला आहे.

्न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने त्यांना सायंकाळी चार वाजता रितसर अटक केली. या प्रकरणाचा तपास आपल्या देखरेखेखाली होईल असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने सेनगर आता पुरते अडकले आहेत. त्यांच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बलात्काराच्या आरोपावरून त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा दंगल माजवण्याचा असून सदर पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर तिसरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची मोठी चर्चा होऊनही उत्तरप्रदेश सरकारने त्यांची अटक टाळल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाने कालच राज्य सरकारची कान उघडणी केली होती. त्यांना तुम्ही अटक करणार आहात की नाही हे स्पष्ट सांगा असे त्यांनी राज्य सरकारच्या वकिलांना विचारले होते. या साऱ्या प्रकरणात पोलिसांच्या वर्तवणुकीवरही न्यायालयाने ताशेरे मारले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)