उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार सनगर विरुद्ध आरोपपत्र

संग्रहित छायाचित्र

लखनौ – उन्नाव येथे झालेल्या अल्पवयीन बालिकेवर बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. गेल्यावर्षी 4 जूनला ही घटना घडली होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये सेनगर आणि त्यांचे साथीदार शशी सिंह यांच्यावर गुन्हेगारी कारस्थान आणि बाल लैंगिक गुन्हे कायद्याच्या विविध कलमांखाली अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या बालिकेला राजकीय नेत्याच्या घरी काम मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तिच्यावर आमदार सेनगर यांच्या घरी 4 जून 2017 रोजी बलात्कार केला गेला होता. त्यानंतर 22 जून ते 20 जून 2017 दरम्यान या मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी आणखी काही जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोपही सीबीआयने आरोपपत्रामध्ये केला आहे.

स्थानिक पोलिसांनी 4 जून रोजी घडलेल्या या घटनेबाबत सेनगर यांच्याविरोधात “एफआयआर’ दाखल केली नव्हती. याप्रकरणी संबंधित डॉक्‍टर, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची भूमिकाही तपासली जात आहे, असेही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पीडीते मुलीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यावर हे प्रकरण उजेडात आले. सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सेनगर यांना यावर्षी 13 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. सेनगर हे बांगेरमाव येथून चारवेळेस विधानसभेवर निवडून गेलेले आमदार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)