उन्नाव बलात्कार प्रकरणी सीबीआयकडून दुसरी अटक

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणी सीबीआयने आज एका महिला आरोपीला अटक केली. देशभरात वादळ उठवून देणाऱ्या या प्रकरणात झालेली ही दुसरी अटक आहे. शशी सिंह असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणी सीबीआयने शुक्रवारी रात्री तब्बल 16 तासांच्या चौकशीनंतर भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर यांना अटक केली. त्यांच्यावर एका 17 वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तर अटक करण्यात आलेली महिला शशी हिनेच संबंधित युवतीला सेंगर यांच्याकडे नेल्याचा आरोप आहे. बलात्कार प्रकरणात भाजप आमदाराचे नाव आल्याने विरोधकांनी उत्तरप्रदेशातील त्या पक्षाच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)