उन्नाव प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नाही : योगी आदित्यनाथ

लखनऊ उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात आम्ही झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबले आहे.  कुठल्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयच्या पथकाने अटक केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण नऊ तारखेला समोर आले. त्यानंतर तातडीने एसआयटी स्थापन करुन, कारवाईस सुरुवात केली. एसआयटीच्या अहवालानुसार, जे पोलिस कर्मचारी आणि डॉक्टर दोषी आढळले, त्यांचे निलंबन करण्यात आले आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.”, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

तसेच, “गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये आम्ही झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबत आहोत. आमचं सरकार अशा प्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड करणार नाही. गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल”, असे आश्वासनही योगी आदित्यनाथ यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)