“उन्नत शेती’ची कार्यशाळा उत्साहात

दावडी- महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती समृद्धी शेतकरी पंधरवडानिमिताने तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन कनेरस येथे करण्यात आले होते. दरम्यान, हा पंधरवडा 7 जून सुरू राहणार आहे.
शेतकरी, अधिकारी, ग्रामस्थ, कृषी विभाग यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. यामध्ये शेती विषयक मार्गदशन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांनी रासायनिक खते न वापरता सेंद्रिय पद्धतीने शेती करणे कसे फायदेशीर होईल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. शमीम शेख यांनी शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय कसा करावा याची माहिती दिली . शेतकऱ्यांनी दुध विक्री करण्यापेक्षा त्यापासून दुग्धजन्य पदार्थ तयार करून त्यांची विक्री केली तर नफ्यामध्ये वाढ होईल. शेळीपालन बंदिस्त गोठ्यापेक्षा मुक्‍त संचार गोठा हा जनावरांच्या आरोग्यांस चांगला आहे असे सांगितले. तर कृषी विभागांचे अधिकाऱ्यांनी शेतीबरोबर कडकनाथ जातीच्या कोंबड्या पाळल्या पाहिजे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे, शेतीच्या पिकांना रासायनिक खते व औषधे न वापरता सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे. दरवर्षी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून त्यानुसार घटक द्रव्ये टाकून पिके घ्यावीत, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.
याप्रसंगी हीरताचे माजी आयुक्त आर सेल्वहराजन, आनिकेत आडसुख, योगेश यादव, पशुधन विकास अधिकारी डॉ. शमीम शेख, संतोष गोरडे, संदिप गावडे, मंडल कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, कृषी पर्यवेक्षक रामचंद्र बारवे, कृषी सहाय्यक वाळे, कृषी पर्यवेक्षक निवृत्ती चासकर, तंत्र सहाय्क अमित कानडे, कृषी संघटना अध्यक्ष नवीन गुंडाळ व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन उषा देशमुख यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)