उनातील अत्याचार पीडितांनी हिंदु धर्म सोडला

नवी दिल्ली – गुजरात मधील चार दलित युवकांना गायीची कातडी काढल्याबद्दल भर लोकांपुढे चाबकाने फटकवण्याचा प्रकरा घडला होता. या प्रकाराचा निषेध म्हणून या चार युवकांनी अन्य तीनशे जणांसह हिंदु धर्माचा त्याग करून आज बौद्ध धर्म स्वीकारला. उनापासून 15 किमी अंतरावर त्यांचे मोता समधीयाला हे गाव आहे. तेथे त्यांनी आज विधीवत बौद्ध धर्म स्वीकारला. बाळू सर्वीय आणि त्याच्या कुटुंबातील 45 जणांचा यात समावेश होता.

पत्रकारांशी बोलताना सर्वीय म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला समाजाकडून त्रास सहन करावा लागला आहे. आमच्या दोन मुलांना जाहीरपणे फटकवण्यात आले. राज्य सरकारकडून आम्हाला काहीही मदत मिळाली नाही. आमच्या मुलांवर अत्याचार करणारे आरोपी आता जामीनावरही बाहेर आले आहेत. आम्ही हिंदु धर्म सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतरही आम्हाला धमकावण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली. या धम्म दीक्षा कार्यक्रमासाठी त्यांनी दलित नेते आमदार जिग्नेश मेवानी यांनाही निमंत्रण दिले होते पण ते आले नाहीत याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)