उध्दव ठाकरे आयोध्येला गेल्याचा आनंदच : फडणवीस

कराड, दि. 25 (प्रतिनिधी) – राममंदीर हा काही राजकीय विषय नाही. राममंदीर झाले पाहिजे, असे तमाम हिंदू समाजाला वाटते. उध्दव ठाकरे आयोध्येला गेले, ही अत्यंत आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील प्रीतिसंगमावरील समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शंभूराज देसाई, आ. विश्वजीत कदम, ना. शेखर चरेगावकर, ना. डॉ. अतुल भोसले यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीराम हे भारतीयांचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांनी आयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाचे त्यांना आशिर्वाद प्राप्त होतील. राम मंदिर हा कुणासाठीही राजकीय विषय नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)