उध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी

नवी दिल्ली: शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांची अयोध्येत सभा होणार असल्याने स्थानिक मुस्लीमांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचा दावा इकबाल अंसारी यांनी व्यक्त केली आहे. राम जन्मभूमि प्रकरणी अंसारी याचिकाकर्ते आहेत.

राम मंदिराच्या मुद्याला बळ देण्यासाठी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभा घेणार आहेत. ठाकरे येथे दोन दिवस राहतील. या सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्‍यता आहे. खूप गर्दी जमली तर काय होईल? आम्ही येथे अल्पसंख्यक आहोत. गर्दी जमली तर आमचे नुकसान होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. आम्हाला संरक्षण नाही मिळाले तर आम्ही दुसरीकडे जावू, असे अंसारी यांनी म्हटले आहे.

अंसारी म्हणाले की, 6 डिसेंबर 1992 रोजी ज्यांनी बाबरी मशीद पाडली तेच लोक आता अयोध्येत येत आहेत. मशीद पाडली तेव्हा एकही मुस्लीम मशिदीला वाचविण्यासाठी गेला नव्हता. तरीसुध्दा, मुस्लिमांची घरे जाळण्यात आली होती. तोडफोड केली. घरे लुटली गेली. हीच माणसे पुन्हा येणार आहेत. अशात, अयोध्येत पुन्हा काय होईल? अशी भीती आमच्या मनात निर्माण झाली आहे, असे अंसारी म्हणाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)