उद्योजक भागवत चौधरी, श्रीधर जोशी यांचा गौरव

पिरंगुट- येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजक भागवत चौधरी आणि श्रीधर जोशी यांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने स्व. नातू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याबद्दल देशभक्त बाबुराव रायरीकर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा पौड (ता. मुळशी) येथे सत्कार केला.
यावेळी सभापती कोमल साखरे, उपसभापती पांडुरंग ओझरकर, जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील चांदेरे, माजी सभापती उज्वला पिंगळे, कोमल वाशिवले, सुनील वाडकर, राम गायकवाड, दीपाली कोकरे, चंदा केदारी, विलास आमराळे, युवराज कलाटे, सुखदेव चांदेरे, गोपीनाथ चांदेरे, अशोक कांबळे आदी उपस्थित होते.
मुळशी तालुक्‍यातील उद्योगांना अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. त्यात नोटबंदी आणि जीएसटीमुळे उद्योजकांच्या अडचणीत आणखीनच भर पडलेली आहे. तालुक्‍यातील अनेक उद्योग स्थलांतरीत झालेले आहेत. बेरोजगारीत प्रचंड वाढ झालेली आहे. म्हणूनच मुळशी तालुक्‍यातील औद्योगिकरणाला बळकटी देण्याची आवशकता असल्याचे प्रतिपादन देशभक्त बाबूराव रायरीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील चांदेरे यांनी सांगितले. रामदास पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. तात्या देवकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)