उद्योजक बना…

शैलजा अनिल गोडांबे 
इंग्रजीमध्ये उद्योजक या शब्दाला Enterpreneur प्रतिशब्द आहे “उद्योजक म्हणजे एक किंवा अनेक व्यवसाय कौशल्यपूर्ण हाताळू शकणारी व्यक्ती. अमेरिका, जपान यांसारख्या प्रगत राष्ट्रांना आर्थिक विकासाची गुपिते खूप आधीच सापडल्याने आर्थिक महासत्ता होण्याची संधी मिळाली. ती ज्यांनी अनेक आधुनिक, नावीन्यपूर्ण, उपयोगी उत्पादने, सेवा-सुविधा निर्माण केल्या आणि उर्वरित जगाला त्या वापरायला भाग पाडल्या अशा उद्योजकांमुळेच, विचार करा… सोनी T.V. , ऍपल गॅजेट्‌स, गुगल, whatsapp शिवाय जगण्याची आपण कल्पना तरी करू शकतो का?

भारतातसुदधा हेच घडायची गरज आहे. आपणही आजमितीला उद्योजकांचे ठशरश्र कशीीे म्हणून स्वागत करायलाच पाहिजे. भारतीय उद्योग क्षेत्राच्या इतिहासातील अजरामर नाव धीरुभाई अंबानी. पेट्रोल पंपावर काम करणारा एक गरीब मुलगा, हाच मुलगा कालांतराने स्वतःचे अबाधित साम्राज्य निर्माण करतो. रिलायन्स पेट्रोल पंप्स, रिलायन्स मोबाइल्स, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स ज्वेलरी…. अद्‌भूत! अविश्‍वसनीय!

लक्ष्मणराव किर्लोस्कर टाटा-बिर्ला, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, विप्रोचे अझीम प्रेमजी, अमूलचे वर्गीस कुरियन, “कॅफे कॉफी डे’ चा तरुण संस्थापक आणि मालक “युथ आयकन’ व्ही. जी. सिद्धार्थ, षश्रळज्ञिरीीं चा प्रणेता सचिन बन्सल- या आणि अशा द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांनी बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम उत्पादनांची निर्मिती केली. लोकांची नेमकी गरज ओळखली. अचूक नस पकडली, आव्हाने स्वीकारली, धोके पत्करले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपयशी होणं नाकारलं. आपल्या उद्योगसमूहाचे कल्पक नियोजन करून लोकांमध्ये विश्‍वास निर्माण केला. त्यासाठी यांनी स्वतःचा वेळ, सुरक्षितता, पैसा, पत आणि बरेच काही पणाला लावले. यशस्वी लोकांची मानसिकताच अशी असते ते जबाबदारीने जोखीम पत्करतात. Safety zone नाकारतात. स्वतःचे ज्ञान, अभ्यास, प्रशिक्षण, अनुभव, आत्मविश्‍वास आणि क्षमतांचा पुरेपूर वापर करतात.

अशा यशस्वी उद्योजकांनी आज समाजापुढे यायला हवं. संवाद साधायला हवा. मिळालेलं यश अपयशाच्याच पायावर उभं आहे याची तरुणाईला जाणीव करून द्यायला हवी, स्वतःच्या अपयशाची चर्चा मुक्तपणे करायला हवी, त्यातून अनुभवलेली यशाची नशा सर्वांपुढे व्यक्त व्हायला हवी. इन्फोसिसची स्थापना करण्यापूर्वी डॉ. नारायण मूर्तींनी सॉप्ट्रॉनिक्‍स नावाची एक कंपनी काढली आणि ती अपयशी ठरली, हे किती जणांना माहीत आहे? फोर्स मोटर्सचे सर्वेसर्वा अमर फिरोदिया- जर्मनी कंपनीबरोबर ताटातूट झाल्यानंतर त्यांनी स्वतः भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान निर्माण केले. सर्वस्व पणाला लावले- यश खेचून आणले. यशस्वी लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. ते प्रत्यक्ष कृती करतात आणि जग त्याची चर्चा! मित्रांनो, स्वतःच्या कल्पनाशक्तीवर, सामर्थ्यावर विश्‍वास ठेवा. लक्षात असू द्या-

नसतील स्वप्ने तर कल्पना कुठून सूचणार. 
कल्पनाच नसेल तर कुठले पंख नी कसली भरारी. 
मानवी मेंदूची झेप आकाशाच्या अथांगतेपेक्षा अधिक आहे. अदृश्‍य गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची धमक त्यात आहे.
एखादी नवी कल्पना घ्या. ती कल्पना, ते स्वप्नच तुमचे सर्वस्व असू द्या. फक्त त्याचाच विचार करा. तेच जगा. तुमचा मेदू, स्नायू, नसानसातून, रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुमचे स्वप्न रुजवा. It’s the Idea that starts money.
किसीने क्‍या खूब कहा है,
अपनी जमी, अपना आकाश पैदा कर,
अपने अस्त्तिव से एक नया इतिहास निर्माण कर।
किसीको मॉंगने से रोशनी कब मिलती है।
अपने बर्ताव से एक नया विश्‍वास निर्माण कर।
तरुणांनो स्वतःचे सिंहावलोकन करा. उठा यशस्वी उद्योजक बनण्याची स्वप्ने पाहा. त्यासाठी सर्वस्व पणाला लावा. संपूर्ण परिस्थितीला विधायक कलाटणी द्या. “मेक-इन-इंडिया’ भारताला महासत्ता बनवण्याच्या क्रांतिकारी बदलाचे एक घटक बना. Padman आणि ‘गुलाबजाम’ या सिनेमाचं सार हेच आहे. जरूर बघा. All the best.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)