पिंपरी – लघुउद्योजकाला मोठ्या कंपनीकडून सुमारे पावणे दोन कोटींची फसवणूक झाली आहे. ही घटना 4 फेब्रुवारी 2002 ते 12 सप्टेंबर 2018 हा कालावधीत घडला.

कुल्लुवित्तील मथ्थाई जॉनी (वय-73, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नेल्वीन पी. वर्गीस (रा. नेल्वीन इंटरप्रायजेस, लांडेवाडी, भोसरी), पी. आय. वर्गीस, जॉन्सन सुवर्णा (दोघे रा. सुवर्णा फायब्रोटेक प्रा. लि., भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून जॉनी यांच्या कंपनीतून 1 कोटी 70 लाख 4 हजार 750 रुपयांचा माल तयार करून घेतला. त्यासाठी रीतसर “वर्क ऑर्डर’ काढण्यात आली. परंतु आरोपींनी झालेल्या कामाची रक्कम जॉनी यांना दिली नाही. तसेच माल देखील परत केला नाही. याविरोधात जॉनी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)