उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे

मुंबई : उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

नायडू म्हणालेदेशाच्या विकासात उद्योजकांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे देशाचा विकास दर सातत्याने वाढत आहे. इज ऑफ डुइंग बिझनेसमुळे उद्योगांना अनेक फायदे झाले आहेत. मॅग्नेटिक इंडिया मुळे जगातील उद्योजकांनी भारतात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. प्रधानमंत्री मोदी सरकारने जाहीर केलेल्या नव्या फायदेशीर धोरणाचे हे फलित आहे. उद्योग उभारणीसाठी अनेक सोयीसुविधा दिल्याने उद्योजक आकर्षित झाले आहेत.

पारदर्शीपणाला प्राधान्य दिल्याने उद्योगधंद्यांना गती प्राप्त झाली आहे. देशात लागू केलेल्या नोटाबंदीजीएसटीचा फायदाच झालेला आहे. शेअर्सफंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फायदा झाला पाहिजे. उद्योजकांनी पारदर्शी कारभारातून समाजाचे कल्याण साधले पाहिजे, असे सांगून त्यांनी पारितोषिक प्राप्त उद्योगपतींचे व मुख्य अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)