उद्योगमंत्री सुभाष देसाईंची चौकशी होणार

माजी अतिरिक्त मुख्य सचिव करणार चौकशी

चौकशीला कालमर्यादा नाही

मुंबई – नाशिक जिल्हयातील इगतपूरी येथील एमआयडीसी जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी राज्याचे निवृत्त अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती उद्योग विभागाने गेल्या पंधरा वर्षांत घेतलेल्या निर्णय तपासणार आहेत. या चौकशीला कोणतीही कालमर्यादा देण्यात आलेली नाही.

पावसाळी अधिवेशनात इगतपुरी तालुक्‍यातील मौजे गोंदेदुमाला व वाडिवरे येथील जमिन गैरअधिसूचित करून गैरव्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. देसाई यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांनी राजीनामा देण्यासाठी विरोधकांनी सभागृहाचे कामकाजही रोखून धरले होते. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभाग़ृहात देसाई यांची चौकशीची घोषणा केली होती. मात्र, ही चौकशी कोण करणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नव्हते.

पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दोन आठवड्यानंतर राज्य सरकारने सुभाष देसाई यांच्या चौकशी समितीची जाहिर केली आहे. राज्याच्या गृह विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या एक सदस्यीय समितीमार्पैत ही चौकशी केली जाणार आहे. ही जमिन गैरअधिसूचित करण्यापूर्वी एमआयडीसीने मागील 15 वर्षांत अशा प्रकारचा निर्णय घेतला होता काय? हा निर्णय एमआयडीसीच्या जमिन गैरअधिसूचित करण्याच्या अधिनियम,नियम यांच्यानुसार घेण्यात आला आहे काय? कॉन्फलीक्‍ट ऑफ इंटरेस्ट दिसून येतो काय? आदी मुद्‌द्‌यांवर ही समिती चौकशी करणार आहे.

संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना चौकशीस बोलाविण्याचे अधिकार के.पी.बक्षी यांना असणार आहेत. तसेच उदयोग उर्जा व कामगार विभाग तसेच एमआयडीसीला संबंधित सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)