उद्योगपती अनंत बजाज यांचे निधन

मुंबई – सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे आणि शेखर बजाज यांचे पुत्र अनंत बजाज यांचे निधन झाले. अनंत बजाज हे बजाज इलेक्‍ट्रिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक होते. ते 41 वर्षांचे होते. अनंत बजाज यांना शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात आई, बहिण, पत्नी आणि मुलगा असे कुटुंब आहे.

अनंत बजाज यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राला धक्का बसला आहे. अनंत बजाज यांचा जन्म 18 मे 1977 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी हसाराम रूजुमल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्‍समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर एस. पी. जैन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1999 मध्ये त्यांनी बजाज इलेक्‍ट्रिकल्समध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून सुरूवात केली. रांजणगावमध्ये 2001 मध्ये कंपनीचा एक मोठा प्लांट उभा करण्यात आला. यामध्ये अनंत बजाज यांचा मोलाचा वाटा होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना बजाज इलेक्‍ट्रिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक हे पद देण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)