उद्योगनगरीसाठी बुधवार ठरला घातवार

एकाच दिवशी सात जणांवर काळाचा घाला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी बुधवार घातवार ठरला. वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाच दिवशी काळाने सात जणांवर घाला घातला. पिंपळे गुरव येथे घडलेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अपघात, आत्महत्या अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण सात जणांनी प्राण गमावले. यामुळे बुधवार हा उद्योगनगरीसाठी घातवारच ठरला आहे.
मोशी येथे राहत्या घरात विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. विनोद ज्ञानेश्वर पाटील (वय 21, रा. तुपे वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी-भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद यांनी राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र बुधवारी (दि.20) पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरीतील मोरवाडी येथे राहत्या घरात गळफास घेऊन आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.20) दुपारी घडली. इस्माईल अब्दुलशाकुर शेख (वय 27, रा. मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इस्माईल यांनी राहत्या घरात छताच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पिंपरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

या दोन आत्महत्यांबरोबरच केएसबी चौक येथे दुचाकीवरून जात असलेल्या 19 वर्षीय तरुणाला डंपरने मागून धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.20) दुपारी पाचच्या सुमारास केएसबी चौकातील पुलावर कुदळवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर झाला. ओंकार मोरे (वय-19) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार दुचाकीवरून कुदळवाडीच्या दिशेने जात होता. केएसबी चौकातील पुलावर आला असता त्याच्या दुचाकीला डंपरने मागून धडक दिली. या धडकेत ओंकार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला. एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दुसऱ्या अपघातात थरमॅक्‍स चौक येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अभिजीत बबनराव काटकर (वय 40, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास थरमॅक्‍स चौक येथे अभिजीत काटकर यांची दुचाकी घसरली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिजीत यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी (दि.20) पहाटे दीड वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. निगडी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. शहरात घडलेल्या पाचही घटनांमध्ये सुमारे सात जणांचा बुुधवारी मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)