“उद्योगनगरी’त साकारणार देशातील पहिले “संविधान भवन’

मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रतिसाद : आमदार महेश लांडगे यांची मागणी

पिंपरी – जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारत देशाचा एकसंघपणा भारतीय संविधान’मुळे टिकून आहे. या संविधानाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती व्हावी. या हेतुने पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील पहिले संविधान भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार लांडगे यांनी बुधवारी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, कुलदीप परांडे आदी उपस्थित होते. “संविधान भवन’ उभारणीच्या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले. तसेच, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे.

आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करणे गरजेचे आहे. संविधान साक्षरता म्हणजे सृजनशील व सुसंस्कृत समाज आणि सृजनशील व सुसंस्कृत समाज म्हणजे “सशक्त भारत’ होणार आहे. असे संविधान भवन उभारल्यास महाराष्ट्र राज्याला त्याचा पहिला मान मिळेल. याचा सकारात्मक दृष्टीने विचार करुन देशातील पहिले संविधान उभारण्यात यावे. याबाबत पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या अधिकारातील मोकळ्या जागेचा विचार करावा, असेही आमदार लांडगे यांनी सूचित केले आहे.

कसे असेल “संविधान भवन’?
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक पाच व आठमधील मोकळ्या भुखंडावर उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संविधान अभ्यास केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. त्यामध्ये तज्ज्ञांचे संविधानावर अभ्यास वर्ग, कार्यशाळा घेतल्या जातील. याशिवाय इतर राष्ट्रांच्या घटना तुलनात्मक अभ्यासासाठी उपलब्ध असतील. “ई’-लायब्ररी, संविधानविषयी विविध पैलू चित्रकला दालन, यूपीएससी, एमपीएससी अभ्यासिका व अभ्यासवर्ग सुरु करण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)