उद्योगनगरीत पाणी कपात?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने 440 एमएलडी पाणी उपसा करून पाणी काटकसरीने वापरण्याचा सूचना पाटबंधारे खात्याने केल्या आहेत. पाणीसाठा कमी झाल्याने त्यानुसार पालिकेकडून उपाययोजना करून खबरदारी घेण्यात येत आहे. संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून भविष्यात पाणी बचतीसोबतच पाणी कपात लागू करण्याची शक्‍यता आहे.

यंदा पावसाळ्याच्या अखेरीस पवना धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे परतीचा पाऊस झाला नाही. धरणात सध्या उपलब्ध असलेला पाणी साठा पुढील वर्षी जुलैअखेरपर्यत पुरविण्यासाठी आतापासूनच पाण्याचा काटकरीने वापर करणे अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे पालिकेने दररोज 470 ते 500 एमएलडी पाणी उपसा न करता 440 एमएलडी पाणी उचलावे. पाणी वापराचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे पत्र पाटबंधारे विभागाने पालिकेस नोब्हेंबरच्या सुरूवातीला पाठविले आहे.

-Ads-

महापालिका दररोज 470 ते 500 एमएलडी पाणी रावेत बंधाऱ्यातून उपसा करते. हे पाणी शुद्ध करून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार पालिकेकडून लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. दररोज तब्बल 60 एमएलडी पाणी कमी झाल्याने शहराचा पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालिकेकडून पाणी कपातीची अंमलबजावणी करून पाणी बचतीची अंमलबजावणी केली जाऊ शकते. आठवड्यातून एकदा किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करून पाणी कपात लागू करण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. त्या संदर्भात पालिकेचे पदाधिकारी व गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

पाटबंधारे विभागाचे पालिकेला पत्र
रावेत बंधाऱ्यातून 440 एमएलडी पाणी उचलण्याबाबतचे पत्र पाटबंधारे विभागाचे पत्र पालिकेस मिळाले आहे. हे पाणी संपूर्ण शहरासाठी पुरेसे आहे. मात्र, भविष्यात विशेषत: उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर पाण्याची मागणी वाढल्यास पाणी कपातीचे धोरण लागू केले जाऊ शकते, असे पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)