उद्योगनगरीत तीन घरफोड्या

पिंपरी – उद्योगनगरीत चिंचवड, तळवडे आणि थेरगाव येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लांबविला.

चिंचवड येथे घडलेल्या घटनेप्रकरणी बबिता आनंदा मोरे (वय-55, रा. इंदिरानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे घर बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप उचकटून आतील कपाटातील 52 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज लांबवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तळवडे येथील घटनेप्रकरणी नानासाहेब पोपट जगताप (वय-31, रा. रूपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगताप हे कामानिमित्त 15 ऑगस्ट 2018 रोजी गावी सोलापूर येथे गेले होते. परत आले असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला. थेरगाव येथील घटनेप्रकरणी परमेश्वर ईश्वर गरड (वय-27, रा. क्रांतीवीरनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गरड यांचे भाऊ महादेव हे लग्नाकरिता मुळगावी गेले होते. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून दुरचित्रवाहिनी संच चोरून नेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)