उद्योगनगरीत अवतरला खानदेश जल्लोष

चिंचवड – नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये येऊन स्थायिक झालेल्या खानदेशवासी बांधवांनी खानदेश जल्लोष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. जाती-धर्माचे बंध झुगारून सर्व समाज यात एकत्र आला. वाल्हेकरवाडी येथील आहेर

रायरेश्वर नाट्य संस्थेचे संस्थापक दत्तात्रय चिंचोले निर्मित,अशोक पत्की संगीत दिग्दर्शित, राजू विश्वकर्मा, अर्जुन महादेव नृत्य दिग्दर्शित वैभव खानदेशन मातीनं हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी एल झेड पाटील, संतोष सौदणकर, नगरसेवक नामदेव ढाके, डॉ.प्रशांत पाटील, चित्रपट निर्माता योगेश कुलकर्णी, दिग्दर्शक लक्ष्मण आलम, उद्योजक भास्कर पाटील, रघुनाथ वाघ, शरद पाटील, अजय गुजर, ज्योती ढाके, भारती भारंबे, गायत्री कोळंबे, नाना सोनार, श्रीराम शिंपी, मोहन भोळे, धनंजय नारखेडे, कैलास आहेर उपस्थित होते.

गंगापूजन, सौ. खानदेश स्पर्धा, वैभव खानदेशन मातीनं, खानदेशचे मानकरी सन्मान सोहळा, खानदेश पैठणी वाटप, खानदेश खाद्य मेळावा, हास्य कला एकपात्री प्रयोग अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. लावणी आणि खानदेशच्या पारंपरिक गाण्यांचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला. खाद्य मेळाव्यातील खानदेशचे लोकप्रिय वरणबट्टी, पुरणाचे मांडे, मूग भजी, गुलगुले, गव्हाची खीर, वांग्याचे भरीत अशा कित्येक खानदेशी पदार्थांचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. विद्यार्थीनी हेमांगी पाटील (पूर्णा नदी), मानसी भोळे (गिरणा नदी), टीना चौधरी (तापी नदी), तेजश्री बोण्डे (अंजनी नदी), अनुष्का पाचपांडे (पांझरा नदी), यशश्री बोरोळे (वाघूर नदी), केयुर कोळंबे (भोगावती नदी) यांनी नदी प्रदूषणाविषयी पर्यावरण जनजागृती करिता सप्तनदी नाट्य सादरीकरण केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर पाटील, रवी महाजन, रमेश इंगळे, महेश चौधरी, गोपाळ बिरारी, अमित डांगे, संतोष चव्हाण, प्रदीप पटेल, माऊली जगताप, भानुप्रिया पाटील, सोनाली पाटील, भारती पाटील, हेमलता पाटील, सरला सोनवणे, निखिल राणे, इंद्रजीत राजपूत, दिगंबर महाजन, नरेंद्र पाटील, घनश्‍याम जावळे यांनी विशेष परिश्रम घेतले. विजय पाटील, महेंद्र पाटील, रेखा भोळे, विभावरी इंगळे, सुरेखा सोनवणे, किरण पाचपांडे यांनी आयोजन केले. नीता चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाटील यांनी प्रास्ताविक व संयोजनकेले. प्रदर्शन रेखा भोळे यांनी आभार केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)