उद्योगनगरीतील सर्वात मोठा राम नवमी उत्सव

पिंपरी – “उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडमधील सर्वात मोठा राम नवमी उत्सव संत तुकारामनगर येथे होणार आहे. त्यासाठी हिंदू गर्जना प्रतिष्ठान व रामराज्य प्रतिष्ठानच्या सहकार्याने कुणालदादा स्पोर्टस फाउंडेशनने जय्यत तयारी केली आहे. समाजातील सर्वधर्मीय नागरिकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक कुणाल लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी येथील संत तुकारामनगरमध्ये डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजपासून उद्या (रविवार, दि.25) भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेमध्ये अग्रभागी तुतारी वादक, बैलगाडीमध्ये सनई चौघड्यांचा निनाद होणार आहे. त्यानंतर 11 घोड्यांसह उंटांचाही समावेश असणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांची वेशभूषा केलेले कलावंत घोड्यावर स्वार होणार आहेत. तसेच, अन्य घोड्यांवर मावळ्यांच्या पोशाखातील युवक-युवती दिसणार आहेत. शोभा यात्रेत तिसऱ्या क्रमांकावर पंजाबी भांगडा नृत्य करणारे 40 कलावंतांचे पथक कला सादर करणार आहे. चौथ्या क्रमांकावर मावळ ढोल-ताशा पथकाचे 50 वादक सेवा सादर करणार आहेत.

तसेच, पाचव्या क्रमांकावर मुले आणि मुलींचा समावेश असलेले 70 वादकांचे “नाद भैरव’ पथक शोभा यात्रेची रंगत वाढवणार आहे. सहाव्या क्रमांकावर खडकी-बोपोडी येथील प्रसिद्ध मानाजी बाग ढोल-ताशा पथक आपल्या 70 वादकांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. त्यानंतर बॅंड पथक आणि शेवटी रामरथ, अशी सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची शोभायात्रा डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजपासून निघणार आहे. संत तुकारामनगर येथील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याजवळ शोभा यात्रेची सांगता होणार आहे, अशी माहिती निमंत्रक कुणाल लांडगे यांनी दिली.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, राज्यसभा खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, उद्योजक उमेश चांदगुडे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक-पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

कसा असेल “राम रथ..’?
शहरातील सर्वात मोठा राम नवमी उत्सव साजरा करण्यासाठी त्याच्या भव्यतेचीही काळजी संयोजकांनी घेतली आहे. शोभा यात्रेसाठी दिमाखदार “रामरथ’ तयार करण्यात आला आहे. सुमारे 40 बाय 10 फूटाच्या ट्रेलरचा सेट तयार केला आहे. त्यावर सात फूट उंच श्री राम यांची मूर्ती बसवण्यात आली आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारुढ पुतळाही या सेटवर ठेवण्यात येणार आहे. सुमारे 750 किलो फुलांची आरास या रथाला करण्यात येणार आहे. सेटच्या चारही बाजुला फुलांच्या सजावटीमध्ये “श्री राम’ अक्षरांचा उल्लेख करण्यात येणार आहे. 25 बाय 10 फूटाच्या जागेत मान्यवरांसाठी स्टेज तयार केले. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध डॉल्बी साउंड सिस्टम आणि विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)