उद्योगनगरीचे लोकशाहीर, लोकमान्यांना अभिवादन

पिंपरी – शालेय साहित्य वाटप, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांबरोबरच, विविध कार्यक्रमांनी अण्णा भाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याशिवाय विविध शाळांमध्ये या दोन्ही महापुरुषांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. भक्ती-शक्ती चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याबरोबरच निगडीतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसभर गर्दी केली होती.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यास तसेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, मनसे गटनेता सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसेविका सुमन पवळे, शर्मिला बाबर, नगरसेवक उत्तम केंदळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, रामकिसन लटपटे, अरुण जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या सुमन पवळे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, रामकिसन लटपटे आदी उपस्थित होते.

महापालिका आणि केसरी मराठा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात कार्यक्रमात आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी महापालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, जनसंपर्क अधिकारी अण्णा बोदडे, कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, अशोक मंगल आदी उपस्थित होते. विजय भोसले यांनी आभार मानले.

प्रेरणा माध्यमिक विद्यालय
प्रेरणा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय थेरगाव येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस प्राचार्य यशवंत पवार व मुख्याध्यापक सुनील सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. याप्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, पर्यवेक्षक धनसिंग साबळे, उमेश आगम, भिमराज शिरसाठ, पांडुरंग दिवटे आदी उपस्थित होते. नाना शिवले, सुनील सोनवणे, उमेश आगम, अरुणा यशवंते यांनी मनोगत व्यक्त केले. मानसी राऊत व रेवती फडतरे या विद्यार्थ्यांनी टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट उलगडून विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. सूत्रसंचालन दत्तात्रय उबाळे यांनी केले. अनिल नाईकरे यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्जुन शेटे, भीमराज शिरसाठ, उमेश आगम, रमेश कदम, पांडुरंग दिवटे, अनिल नाईकरे, दादा शेजाळ, विजय जाधव, दिलीप माळी, पुरुषोत्तम पाटील, अरुणा यशवंते, संगिता दगडे, बिपीन देशमुख, अर्चना कदम ,अमृता बाबा, सुचेता गुजरे यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रतिमेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, प्रवक्ते फजल शेख, आनंदा यादव, विनोद कांबळे, सचिन माने, संजय औसरमल, मनिषा गटकळ, इम्रान शेख, बाळासाहेब पिल्लेवार, मनिष शेडगे, गणेश पुंडे, संदीप पाटील, मनोहर भोसले, प्रशांत कडलग, शशिकांत निकाळजे, सविता धुमाळ, उल्हास चंदनशिवे, सुनील अडागळे आदी उपस्थित होते.

रयत विद्यार्थी मंच
पिंपरीतील रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अध्यक्ष संदेश पिसाळ यांच्या हस्ते लोकशाहिरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थापक धम्मराज साळवे, महासचिव संतोष शिंदे यांनी अण्णा भाऊंच्या जीवनावर मार्गदर्शन केले. मेघा आठवले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, सचिव नीरज भालेराव, शहराध्यक्ष रोहीत कांबळे, सहसचिव समाधान गायकवाड, शहर सचिव आनंद विजापुरे, उपाध्यक्ष महेश गायकवाड, सदस्य निखिल मुरकुटे आदी उपस्थित होते.

कॉंग्रेस पर्यावरण विभाग
कॉंग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने अध्यक्ष अशोक मोरे व माजी नगरसेविका निगार बारस्कर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. तुळस, एलोवीरा, इन्सुलिन असे नानाप्रकारच्या औषधी वृक्षांचे रोपवाटप व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष अशोक मंगल, प्रदेश उपाध्यक्ष दिलीपसिंग मोहिते, महासचिव राजन पिल्ले, सचिव आयुष मंगल, अशोक काळभोर, उमेश बनसोडे, चिंचवड ब्लॉक कॉंग्रेसचे संदेश नवले, आबा खराडे, एस. टी. कांबळे, मेहबूब शेख, गुरुदेव वैराळ, राजेश नायर, बिभीषण क्षिरसागर, हर्षद ताथेड, श्वेता मंगल, मिताली चक्रवर्ती, नेहा मंगल, जयश्री कनाइके, अक्षांश मंगल, राओसा एर्नाल, सुनील पवार, अमृत बहादुर, गगन भूल, बाबा ओव्हाळ, अनिता मांडवडे, भीमाशंकर सरगुंडी, सुरेश कानिटकर, कांबळे आदी उपस्थित होते.

भाजपा युवा मोर्चा
भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवी लांडगे यांनी दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी प्रदेश युवा मोर्चा चिटणीस अनुप मोरे, प्रभाग समिती स्विकृत सदस्य वैशाली खाडये, भाजयुमोचे अजित कुलथे, दीपक नागरगोजे, युवराज लांडे, प्रवीण सिंग, मधुकर बच्चे, राहुल शिंदे, मंगेश धाडगे, भुषण गायके, पंकज वेंगुर्लेकर, गणेश संभेराव, पवन जाधवार, भागवत मुंडे, राजेश राजपुरोहित, प्रदीप पटेल, अमित देशमुख, सचिन बंदी, ओंकार मोरे, अनिल सौंदळे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)