उद्योगधंदे उभारण्यात उत्तर प्रदेशचे नेते अयशस्वी : राज ठाकरे

महाराष्ट्रात मराठी तरुण-तरुणींना प्राथमिकता दिली पाहिजे

मुंबई: उद्योगधंदे आणू न शकणारे उत्तर प्रदेशचे नेते अयशस्वी आहेत. जे पंतप्रधान झाले त्यातील 70 ते 80 टक्के उत्तर प्रदेशाचे होते. तुम्ही जे प्रश्न आहेत ते त्यांना का विचारत नाहीत. पंतप्रधान पदासाठी मतदारसंघ चालतो मग रोजगार का मिळत नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

कोणीही हाकलेले की मुंबईत यायचे
गोव्याचे मंत्री रवी नाईक यांनी भिकाऱ्यांची ट्रेन नको असे म्हणत बिहार ट्रेनला विरोध केला होता. तेव्हा कोणाचे रक्त उसळले नाही, तेव्हा कोणी प्रश्न विचारला नाही. आसाममध्ये तर बिहारींची हत्या करण्यात आली होती. तिथे मोठे आंदोलन झाले होते. त्याचेही काही झाले नाही. त्याबद्दलही कोणी बोलत नाही. एक महिन्यापूर्वी तर गुजरातमधून हाकलले होते. 10 ते 15 हजार लोक मुंबईत आले. कोणत्याही राज्यातून हाकलले की मुंबईत येतात.

उत्तर भारतीय महापंचायत समितीच्या वतीने आयोजीत कार्यक्रमावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम मुंबईतील कांदिवली येथे पार पडला. राज ठाकरे म्हणाले, देशातील व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो असे म्हटले जाते. पण कायदा कोणी वाचला आहे, असे वाटत नाही. येथूनच खरी समस्या निर्माण होते. मी स्पष्टीकरण देण्यास आलेलो नाही, फक्त माझी भूमिका हिंदीतून सांगण्यासाठी आलो आहे. जर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध आहे, तर येथील तरुणांना प्रथम संधी मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

माझ्या राज्यात मराठी तरुण-तरुणींना प्राथमिकता दिली पाहिजे, उरले तर इतरांना द्या. एखाद्या राज्यात गेल्यानंतर त्याचा आदर केला पाहिजे. परदेशात गेल्यानंतर हिंदीत बोलतो का ? महाराष्ट्रात जे झाले त्याचे जे चित्र निर्माण करण्यात आले ते इतर राज्यांच्या बाबतीत का नाही झाले, असे ते म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून केंद्र सरकारकडे कर रूपाने जेव्हा 100 रुपये जातात, त्यावेळी केंद्राकडून महाराष्ट्राला जेमतेम 13 रुपयांची मदत मिळते. मात्र, त्याचवेळी बिहारमधून जेव्हा 100 रुपये केंद्राकडे जातात, त्यावेळी बिहारला केंद्राकडून तब्बल 139 रुपयांची मदत मिळते. तर हे पैसे जातात कुठे असा सवाल त्यांनी केला. केंद्राकडून इतका निधी मिळूनही बिहार आणि उत्तर प्रदेशच्या नेत्यांना आपल्या राज्यांचा विकास करता येत नसेल. आणि तेथील जनतेला बाहेरच्या राज्यात जावून अपमानित व्हावे लागत असेल, तर त्यांना जाब कोण विचारणार. ही स्थिती आम्ही जास्त काळ चालू देणार नाही, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)