आज शांतता कमिटीची बैठक

सातारा, दि. 13 (प्रतिनिधी)

रमाजान ईदच्या पार्श्‍वभुमीवर साताऱ्यातील शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस करमणुक केंद्र सातारा येथे गुरूवार दि. 14 रोजी दुपारी सव्वा चार वाजता होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील हे सातारा शहरातील शांततेचा आढावा घेणार असून यावेळी सातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे, सातारा शहरचे पो.नि. नारायण सारंगकर, शाहूपुरीचे पो.नि. चंद्रकांत बेदरे, सातारा तालुकाचे पो.नि. प्रदीप जाधव उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)