उद्या येड्डियुरप्पा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ ?

बंगळुरू:  कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी सकाळपासूनच आटोकाट  प्रयत्न केल्यानंतर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बी. एस. येड्डियुरप्पा यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, उद्या गुरुवारी दुपारी १२.३० वाजता येड्डियुरप्पा यांचा शपथविधी पार पडणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

आज सकाळी ११ वाजता भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत येड्डियुरप्पा यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर येड्डियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर राज्यपाल वजूभाई वाला यांना भेटले आणि त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यावेळी येड्डियुरप्पा यांनी राज्यपालांना आमदारांच्या पाठिंब्याची यादीही सोपवली आहे.

दरम्यान, जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे. कॉंग्रेस आणि जेडीएसनेही कालच सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यामुळे राज्यपाल आता काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्या गुरुवारी दुपारी १२.३० वाजता येड्डियुरप्पा यांना शपथ घेणार असून राजभवनातून तसे संकेत मिळाल्याचे भाजपच्या सूत्रांचे  म्हणणे आहे. येड्डियुरप्पा यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसनेही मोर्चेबांधणी सुरू केली असून आमदार फुटू नये याची खबरदारी घेत आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)