उद्या मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवणार -हवामान विभाग

नवी दिल्ली : यंदा पुरेसा पाऊस पडणार का या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. हवामान विभाग यंदाच्या मान्सूनबद्दल सोमवारी स्वतःचा अंदाज जाहीर करणार आहे. यंदा उत्तम मान्सूनची शक्यता अधिक असल्याचा अंदाज अगोदरच तज्ञांकडून व्यक्त करण्यात आहे. मान्सून जून महिन्यात केरळला धडकण्याची आणि सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा पाऊस सुरू राहील असे हवामान तज्ञांचे मानणे आहे.

सोमवारी हवामान विभाग दक्षिण-पश्चिम मान्सूनसाठी दीर्घ कक्षेचा अनुमान प्रसिद्ध करणार आहे. एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यांमध्ये पावसाचा अंदाज  वर्तवला जाणार आहे. हवामान विभागाचे महासंचालक के.जे. रमेश सोमवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती देणार आहेत. खासगी संस्था स्कायमेटने मान्सूनचा अनुमान अगोदरच वर्तविला आहे. स्कायमेटनुसार यंदा मान्सून सरासरीत राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर कालावधीत मान्सूनमुळे 100 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. संस्थेने दुष्काळ पडणार नसल्याचा दावा करत शेती तसेच अर्थव्यवस्थेसाठी यंदाचा मान्सून चांगला राहणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे.

उत्तर भारतात वाराणसी, गोरखपूर, लखनौ, शिमला, मनाली, देहरादून, श्रीनगर सेमवेत पूर्व उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. तर दिल्ली, अमृतसर, चंदीगढ, आगरा, जयपूर आणि जोधपूरमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. प्रशांत महासागरात विषवृत्तीय रेषेजवळील समुद्रात तापमानात घट झाली आहे. जूनपर्यंत यात बदलाची शक्यता धूसर आहे. अशा स्थितीत तेथे ला नीना प्रभाव निर्माण होतो, ज्याला चांगल्या मान्सूनचे द्योतक मानले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)