उद्यापासून ‘केडीसी’ देणार शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्ज

आमदार हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर, दि. 19(प्रतिनिधी) – राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील खरीप हंगामासाठीचे 10 हजाराचे तत्काळ कर्ज देण्यास हरकत घेतल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना व शासनाने दिलेली हमीनुसार जिल्हा बॅंकेकडून या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार उद्यापासून (मंगळवार) या कर्जाचे वाटप शासनाच्या निकषानुसार शंभर रूपयाच्या स्टॅम्पपेपर शपथपत्रावर दिले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.

मुश्रीफ म्हणाले की, राज्य शासनाने आदेश काढून जिल्हा बॅंकांना दहा हजाराचे कर्ज वाटप करण्याचे आदेश काढले होते, पण रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डच्या निर्णयानुसार थकबाकीदारांना कर्जवाटप नियमबाहय होते. शिवाय बॅंकेला या कर्जाच्या हमीबाबत साशंकता होती. त्यामुळे कर्जवाटपास नकार होता. पण शासनाने या कर्जाची थकहमी मान्य करत ही रक्कम शासनाकडून मिळवून देण्याचे पत्र दिल्याने शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याच्या प्रस्तावास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना उद्यापासून कर्जवाटप करण्यात येणार आहे.या कर्जासाठी बॅंकेच्या नियमानुसार टक्के व्याज आकारण्यात येणार असून ठेवीदारांना व्याज देण्यासाठी ही आकारणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)