उद्यान विभागाची जागा मेट्रोला हवी?

2,342 चौ.मी. क्षेत्राची गरज : प्रशासनाचा विरोध

पुणे – शहरातील मेट्रो प्रकल्पाला महापालिकेच्या उद्यान विभागाची तब्बल 2 हजार 342 चौरस मीटर जागा हवी आहे. यापैकी सर्वात जास्त जागा ही संभाजी उद्यानाची असून ती 1 हजार 400 चौरस मीटर इतकी आहे. त्यामुळे संभाजी उद्यानाचे क्षेत्र कमी होणार आहे. मात्र उद्यान विभागाचा जागा देण्याला विरोध आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महामेट्रोकडून पुणे शहरामध्ये वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा दोन मार्गांचे काम सुरू आहे. महामेट्रोने महापालिकेला पत्र लिहून महापालिकेच्या ताब्यातील 16 हजार 425 चौरस मीटर जागेची मागणी केली आहे. या जागा 27 ठिकाणी असून, यामध्ये 6 उद्यानांचा समावेश आहे.

मेट्रो प्रकल्पासाठी संभाजी उद्यानातील 1,400 चौरस मीटर जागेची आवश्‍यकता आहे. संभाजी उद्यानात मत्स्यालय आणि विविध प्रजातीची फुलझाडे आहेत. 6 एकरमधील हे उद्यान शहरातील सर्वांत सुंदर उद्यानांपैकी एक आहे. स्वातंत्र्यानंतर 6 वर्षांनी म्हणजेच दि. 1 ऑगस्ट 1953 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. संभाजी उद्यानाजवळ मेट्रोचे स्टेशन असल्यामुळे भविष्यात तेथे जाण्यासाठी उद्यानाची जागा आवश्‍यक आहे. या जागेत जिना आणि पूल बांधण्यात येणार आहे. संभाजी उद्यानाबरोबर नाना-नानी उद्यान, व्हिक्‍टोरिया उद्यान, बंड गार्डन, निळू फुले उद्यान, मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानाची जागा आवश्‍यक आहे.

उद्यान विभागाचे जागा देण्यास विरोध आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी बैठक घेतली असून महामेट्रोला उद्यानाच्या जागेत कोणते काम करता येणार आहे, याची माहिती मागविली आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनीही संभाजी उद्यानाच्या जागेमध्ये करण्यात येणाऱ्या कामाचा विस्तृत आराखडा देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)