उद्यानाचे “सेफ्टी ऑडीट’ करण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील उद्यानातील घसरगुंडीवर खेळत असताना पत्र्यात पाय अडकल्याने सहा वर्षाच्या मुलाची करंगळी निकामी झाली. यामुळे उद्यानातील निकृष्ट खेळण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांचे “सेफ्टी ऑडीट’ करुन तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची मागणी मुलाचे पालक मयूर जोशी यांनी महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.

अथर्व मयूर जोशी (वय 6, रा. प्राधिकरण, मोशी) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व हा 24 डिसेंबर रोजी महापालिकेच्या संभाजीनगर येथील शिव शाहू संभाजी उद्यानात खेळण्यासाठी आला होता. खेळत असताना उद्यानातील घसरगुंडीच्या पत्र्यात अथर्वचा उजवा पाय अडकून झालेल्या अपघातात त्याची कंरगळी तुटली. याबाबत अथर्वचे वडील मयूर जोशी यांनी महापालिकेला पत्र लिहून या नादुरुस्त खेळण्यामुळे झालेल्या अपघाची चौकशी करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांचे “सेफ्टी ऑडीट’ करुन तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करावी. संभाजीनगर येथील शिव शाहू संभाजी उद्यानातील घसरगुंडी महिनाभरापासून नादुरुस्त आहे. याकडे देखभालीचे काम करणार कर्मचाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. घसरगुंडी वापरु नये, असा फलक देखील याठिकाणी लावलेला नाही. त्यामुळेच हा अपघात झाला. महापालिका उद्यान विभागाने याची चौकशी करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची नियुक्ती केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार त्यावर निर्णय घेण्यात येईल.
– संतोष पाटील, अतिरिक्‍त आयुक्‍त, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)