उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येकडे रवाना 

अयोध्या – भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी शिवसेनेसह काही हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. यासाठी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आज आपल्या परिवारासह खाजगी विमानाने अयोध्येकडे रवाना झाले आहेत. दुपारी २ वाजता ते फैजाबाद विमानतळावर उतरतील. या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण शहरात सीआरपीएफ, पीएसी आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्‍य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. “लक्ष्मण किला’वर उद्धव ठाकरे यांचा साधुसंतांकडून सत्कार होणार आहे. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहे. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. “लक्ष्मण किला’वरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)