उद्धव ठाकरेंवर रोहित पवारांची टीका 

मुंबई – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर सामनाच्या मुखपत्रातून जहरी टीका करण्यात आली होती. या टीकेचा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे चांगलाच समाचार घेतला आहे. आमच्या उद्धवला सांभाळा हे बाळासाहेब अखेरच्या क्षणी का म्हणाले होते याचा अर्थ मला आज समजला. लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता, अशा शब्दात रोहित पवार यांनी शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय होता सामनाचा अग्रलेख –
बुधवारी (२४ ऑक्टोबर) अजित पवार यांनी एका कार्यक्रमात शिवसेनेच्या अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या भूमिकेवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. बापाचे स्मारक पाच वर्षात बांधता आले नाही, तिथं अयोध्येत जाऊन काय करणार? असा शाब्दिक मारा अजित पवार यांनी केला होता. पवारांच्या ‘या’ वक्तव्यानंतरच शिवसेनेने देखील त्यांना ‘ठाकरी’ भाषेत टोले लगावले होते. सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्या विवादित ‘धरण’ वक्तव्याचा उदोउदो करण्यात आला. ‘अजित पवार आणि त्यांच्या टोळीने १५ वर्ष सरकारी तिजोरीची लूट केल्यानेच शेतकऱ्याच्या तोंडचा घास-पाणी पळालं आहे’, अशी टीकादेखील त्यांच्यावर करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहे रोहित पवारांची फेसबुक पोस्ट –
बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा ! त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा.

बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. मार्मिक असो कि सामना त्यांनी टिका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला.

उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतलं नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत. इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता.

1 COMMENT

  1. Rohit pawar is not in politics, hence he really can not comment. I do not know his relation with shrad pawar. Uddhav is far superior in politics that shrad pawar. Balasaheb Thakre never said “बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा ! त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा.” in the context you are assuming here. It took him 6 years to understand the sentence.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)