उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांशी भेट नाकारली

मुंबई : भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी तूर्तास तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी वेळ दिली नाही.

उद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा लांबणीवर पडली आहे. अहमदनगरमध्ये शिवसैनिकांचं झालेलं दुहेरी हत्यांकाड, नाणार प्रकल्पाला वाढता विरोध, यामुळे युतीच्या चर्चेला खीळ बसल्याची सूत्रांची माहिती आहे.

याआधीच शिवसेनेने भविष्यात भाजपशी कुठलीही युती करणार नाही, असे स्पष्ट केले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिले होते. ‘भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,’ तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यातूनच जाहीर केलं होतं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)