उद्धव ठाकरेंनी चुकीचे राजकारणे केले – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – पालघर पोटनिवडणुकीच वातावरण चांगलंच तापलं आहे. उमेदवार देण्यावरून सुरू झालेला भाजपा-शिवसेनेतील वाद आता टोकाला गेला आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप झाल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत मुखमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

पालघरच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी कोणतीही शहानिशा न करता चुकीचे राजकारण केल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी सरकारला 4 वर्षे पूर्ण झाल्याने विकासकामांची माहिती देण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी सरकारने आजपर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखा जोखा महसूलमंत्र्यांनी मांडला.

यावेळी पालघर निवडणुकीत होणाऱ्या राजकारणाविषयी महासुलमत्र्यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली. गेल्या 4 वर्षात भाजपा-सेना यांनी एकही निवडणूक एकत्र लढली नसल्याचे सांगत पालघर पोटनिवडणूक उद्धव ठाकरे यांनी चुकीचे राजकारण केले असून कटुता निर्माण केली आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तसेच शिवसेनेशी युती करणे हि भाजपची अगतिकता असून युती न झाल्यास कॉंग्रेस सत्तेत येईल असा अंदाज देखील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला. तसेच दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबातून एकास उमेदवारी देण्याचे भाजपने निश्‍चित केले होते. पण याबाबतची कसलीच खातरजमा न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरु असलेल्या कार्यशैलीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यास उचलून आणून उमेदवार जाहीर केला. शिवसेनेची हि कार्यशैली वादाला कारणीभूत ठरली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)