उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे विश्लेषण करणाऱ्यांना १५१ रुपयांचे बक्षीस – मनसे

मुंबई : राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या अयोध्या दौऱ्यानंतर काल पंढरपूरला झालेल्या विराट सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टीका करत मी झोपलेल्या कुंभकर्णाला जागा करायला आलो आहे. त्याचबरोबर राफेल, कर्जमाफी,पीकविमा यामध्ये घोटाळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी २५ वर्ष आमची युतीत सडली, महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकावणार असल्याचे बोलले होते. मात्र काल पंढरपुराच्या सभेत युतीचे आम्हला देणे घेणे नाही, युतीचे काय करायचे ते जनता निर्णय ठरवेल. जागावाटपाचे नंतर पाहू पहिल्यांदा शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा. अशा वक्तव्यामुळे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आधीच्या आणि काल झालेल्या भाषणाचा संदर्भ जोडत उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे कोण विश्लेषण करेल, अर्थ सांगेलं त्याला मनसे १५१ रुपयांचे बक्षीस देणार, असा खोचक टोला लगावला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंढरपूमध्ये झालेल्या कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीकविमासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. आता याचे उत्तर बीजेपी कशा प्रकारे देते. तर मनसेच्या टीकेला सेना कशी उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)