उद्धव, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारकडून वाढ

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र व युवा सेनेचे प्रमुख आदित्य यांची सुरक्षा राज्य सरकारने वाढवली आहे. सुरक्षेसंदर्भात राज्य गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालानंतर राज्याच्या गृह विभागाने हे पाऊल उचलले. त्यामुळे उद्धव यांना झेडवरून झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळली आहे. तर आदित्य यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा उपलब्ध झाली आहे. त्यांना याआधी एक्‍स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.

ठाकरे पिता-पुत्रांच्या सुरक्षेबाबत गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालाचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, त्या अहवालानंतर राज्य सरकारने लगेचच त्यांची सुरक्षा वाढवण्याचे पाऊल उचलले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)