उद्दीष्ट, जोखीम आणि परताव्याची अपेक्षा (भाग-१)

गुंतवणूक करत असताना नेमक्या कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे याबाबत बहुसंख्यवेळा गुंतवणूकदाराच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आपण आईसक्रीम पार्लरमध्ये गेल्यावर अनेक रंगाच्या व चवीच्या आईसक्रीम पाहतो परंतु सगळ्यांमधील कोणत्या चवीची आईसक्रीम घ्यावी असा विचार मनात येतो. त्याचप्रमाणे रक्कम हाती असल्यावर नेमकी कुठल्या ठिकाणी गुंतवणूक करावी याबाबतचा गोंधळ उडतो. यासाठी आपल्या विश्वासू व अभ्यासू आर्थिक सल्लागाराच्या मदतीनेच नेमक्या गरजेनुसार योग्य अशा म्युच्युअल फंड योजनेची निवड करणे आवश्यक आहे.

आज भारतामध्ये म्युच्युअल फंड चालवणाऱ्या ४३ कंपन्या आहेत. म्युच्युअल फंडातील जवळपास १६०० पेक्षा जास्त डेट योजना, ५०० पेक्षा जास्त इक्विटी योजना व इतर ४९५ योजना सध्या कार्यरत आहेत. अशा योजनांच्या अंतर्गत रु. २४.३१ लाख कोटी एवढी रक्कम गुंतवणूकदारांनी गुंतवलेली आहे. गुंतवणूक करताना आपली गुंतवणूक किती काळासाठी करावयाची आहे, अपेक्षित परतावा व त्यासाठी किती जोखीम घेण्याची तयारी आहे याचा सारासार विचार गुंतवणूकदाराने करणे अपेक्षित आहे. केवळ एखाद्या योजनेमध्ये मागील काही वर्षात खूप चांगला परतावा मिळाला असेल तर केवळ परतावा पाहून योजनेमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही.

हे सर्व मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे.

-Ads-

किती काळासाठी

गुंतवणूक करताना ती किती काळासाठी करायची आहे हे निश्चित करा. ज्यावेळेस गुंतवणूकदाराकडे गुंतवणुकीसाठी पैसे उपलब्ध असतात त्यावेळी सदर रक्कम भावी काळात केव्हा लागणार आहेत याचा निश्चित विचार करायला हवा. आपण सदर रक्कम कोणत्या उद्दीष्टासाठी गुंतवत आहोत हे फार महत्त्वाचे असते. जसे की, नवीन गाडी खरेदी, घराची खरेदी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या निवृत्तीनंतरची तरतूद, जसे उद्दीष्ट आहे तसा गुंतवणुकीचा कालावधी ठरतो आणि त्यानुसार योग्य योजनेत गुंतवणूक करून त्यानुसार अपेक्षित परतावा मिळतो.

उद्दीष्ट, जोखीम आणि परताव्याची अपेक्षा (भाग-२)

गुंतवणुकीचे नेमके उद्दीष्ट ठरवा

आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या रकमेचा वापर नेमक्या कुठल्या उद्दीष्टपूर्ततेसाठी करावयाचा आहे हे प्रथमतः ठरवणे गरजेचे आहे. आपल्या गुंतवणुकीवरील वृद्धी ही गुंतवणूक किती कालावधीसाठी असणार आहे यावर अवलंबून असते. गुंतवणुकीच्या उद्दीष्टानुसार गुंतवणुकीच्या कालावधीचा विचार करावा लागतो. याचा विचार करून योग्य योजनेची निवड करणे अपेक्षित असते. यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. छोट्या काळातील उद्दीष्टांसाठी खास तयार केलेले लिक्विड फंड हा उत्तम पर्याय ठरतो. मध्यम काळाच्या उद्दीष्टांसाठी (साधारणतः तीन ते पाच वर्षे) बॅलन्सड् फंड योजनांची निवड करावी. दीर्घकालीन उद्दीष्टांसाठी (पाच वर्षांपेक्षा जास्त) उत्कृष्ठ डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड योजनांची निवड करावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)