उद्दीष्ट, जोखीम आणि परताव्याची अपेक्षा (भाग-२)

गुंतवणूक करत असताना नेमक्या कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे याबाबत बहुसंख्यवेळा गुंतवणूकदाराच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आपण आईसक्रीम पार्लरमध्ये गेल्यावर अनेक रंगाच्या व चवीच्या आईसक्रीम पाहतो परंतु सगळ्यांमधील कोणत्या चवीची आईसक्रीम घ्यावी असा विचार मनात येतो. त्याचप्रमाणे रक्कम हाती असल्यावर नेमकी कुठल्या ठिकाणी गुंतवणूक करावी याबाबतचा गोंधळ उडतो. यासाठी आपल्या विश्वासू व अभ्यासू आर्थिक सल्लागाराच्या मदतीनेच नेमक्या गरजेनुसार योग्य अशा म्युच्युअल फंड योजनेची निवड करणे आवश्यक आहे.

उद्दीष्ट, जोखीम आणि परताव्याची अपेक्षा (भाग-१)

जोखीम स्वीकारण्याची क्षमता तपासा.

-Ads-

गुंतवणूक करत असताना उद्दीष्ट व गुंतवणुकीचा कालावधी ठरवतो त्याचप्रमाणे आपल्या या गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त जोखीम घेण्याची नेमकी किती तयारी आहे याचाही विचार करणे आवश्यक असते. कमी जोखीम घेऊन गुंतवणूक केल्यास फार मोठा परतावा मिळण्याची अपेक्षा करणे रास्त ठरत नाही. गुंतवणूक करताना जोखीम कमी अथवा जास्त, गुंतवणुकीचा कालावधी योग्य ठेवल्यास बऱ्याच अंशी परतावा वाढवता येतो. बराच वेळा गुंतवणुकीतून फार मोठ्या परताव्याची अपेक्षा असते. परंतु आपण गुंतवणुकीतील कालावधी व जोखीम कमी करत असतो. त्यामुळे आपल्या अपेक्षित उद्दीष्टपूर्ततेसाठी गुंतवणूकीतून फारच कमी परतावा तयार होतो.

गुंतवणुकीमध्ये नुकसान सहन करण्याची क्षमता किती आहे हे तपासणे फार महत्त्वाचे असते. केवळ जास्त परतावा हवा परंतु नुकसान झालेले चालणार नाही अशी भूमिका असल्यास अपेक्षित कालावधीत, अपेक्षित परतावा मिळूच शकत नाही. यासाठी आर्थिक सल्लागार प्रत्येक गुंतवणूकदाराच्या नेमक्या गरजा ओळखून उपलब्ध असलेल्या कालावधीमध्ये योग्य परतावा देणाऱ्या योजनांची निवड करत असतात. शेअर बाजारात होणाऱ्या रोजच्या चढउतारांमुळे योग्य मार्गदर्शन आपले आर्थिक सल्लागार करत असतात. यामुळेच गुंतवणूकदार अयोग्य निर्णयाच्या वाटेला जाऊ शकत नाही.

योग्य कालावधी, योग्य जोखीम व योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे महत्त्वाचे असते. गुंतवणुकीवर मिळणारा परतावा वरील सर्व बाबींवर अवलंबून असतो. त्यामुळे आपल्या ठरवलेल्या उद्दीष्टांसाठी निश्चितच योग्य योजना निवडणे महत्त्वाचे असते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)