उदित गोगोई, क्रिश पटेल, अनंत मुनी, रोनिन लोटलीकर यांचे विजय

  एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा

पाचगणी – उदित गोगोई, क्रिश पटेल, अनंत मुनी, रोनिन लोटलीकर, अमन तेजाबवाला व रोहन कुमार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षांखालील राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेने रवाईन हॉटेल यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल मधील टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील 16 वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित उदित गोगोई याने यशवर्धन सिंगचा 6-2, 6-0 असा धुव्वा उडविला. तर चौथ्या मानांकित क्रिश पटेलने यशराज दळवीचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सहाव्या मानांकित नितीन सिंगने अनुप बंगार्गीचा 6-2, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

अन्य सामन्यांत अकराव्या मानांकित आदित्य बलसेकरने अन्मय देवराजचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6 (3) असा पराभव करून आगेकूच केली. बाराव्या मानांकित अमन तेजाबवालाने विशाल गौतमवर 6-3, 6-1 अशा फरकाने विजय मिळवला. धनुष पटेल याने अर्जुन फोगटचे आव्हान 6-2, 6-3 असे मोडीत काढले. तसेच रोनिन लोटलीकरने अमन कुमारला 6-4, 6-2 असे नमविले. आणखी एका लढतीत रोहन कुमारने अर्जुन चॅटर्जीचा 6-1, 5-7, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला. तर चौदाव्या मानांकित चेतन गडीयारने प्रथम भुजबळवर 6-1, 7-5 अशा फरकाने विजय मिळवताना दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

 सविस्तर निकाल –

पहिली फेरी – 16 वर्षांखालील मुले – उदित गोगोई (1) वि.वि. यशवर्धन सिंग 6-2, 6-0; क्रिश पटेल (4) वि.वि. यशराज दळवी 6-2, 6-3 नितीन सिंग (6) वि.वि. अनुप बंगार्गी 6-2, 6-4; अदित्य बलसेकर (11) वि.वि. अन्मय देवराज 6-4, 7-6 (3); अमन तेजाबवाला (12) वि.वि. विशाल गौतम 6-3, 6-1; अर्जुन कुंडू (13) वि.वि. प्रणव हेगरे 6-3, 6-3; चेतन गडीयार (14) वि.वि. प्रथम भुजबळ 6-1, 7-5; हृषिकेश संगनडहाळी वि.वि. अर्जुन रत्नम 6-4, 6-4; रिकी चौधरी वि.वि. मानव जैन 6-3, 6-4; रोहन कुमार वि.वि. अर्जुन चॅटर्जी 6-1, 5-7, 6-4; अरविंद पेन्नाराजू वि.वि. हर्षा कुमार 6-3, 6-3; निथिलन इरीक वि.वि. सोहम जाने 6-2, 6-2; अनंत मुनी वि.वि. सिद्धार्थ जाडली 6-7 (4), 6-1, 6-2; धनुष पटेल वि.वि. अर्जुन फोगट 6-2, 6-3; रोनिन लोटलीकर वि.वि. अमन कुमार 6-4, 6-2.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)