उदिता गोस्वामीला पुत्ररत्न

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उदिता गोस्वामी दुसऱ्यांदा आई झाली आहे. उदिताने 21 तारखेला एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी उदिताचा पती आणि दिग्दर्शक मोहित सुरीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

त्यांनी बाळाचे नामकरणही केले असून त्याचे नाव “कर्म’ असे ठेवल्याचे उदिताने इन्स्टाग्रामवरुन सांगितले. उदिताने शेअर केलेल्या जुन्या फोटोमध्ये गर्भावस्थेतील उदिता, मोहित आणि त्यांची मोठी मुलगी देवी दिसत आहेत.
गेल्याच आठवड्यात उदिताने मॅटर्निटी फोटोशूट शेअर करत चाहत्यांना धक्का दिला. गेल्या काही वर्षांपासून उदिता बॉलिवूडपासून दूर आहे. उदिता आणि मोहित सुरी यांचा 2013मध्ये विवाह झाला होता. तिची मोठी मुलगी देवीचा जन्म 2015 मध्ये झाला. मोहित सुरीने दिग्दर्शन केलेले मर्डर 2, आशिकी 2, एक व्हिलन, हमारी अधुरी कहानी, हाफ गर्लफ्रेण्ड असे चित्रपट प्रसिद्ध आहेत.

पूजा भट्टच्या “पाप’ चित्रपटातून 2003 साली उदिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत तिची सिझलिंग केमिस्ट्री गाजली होती. त्यानंतर ती मोहित सुरी दिग्दर्शित झहरमध्ये झळकली.
2012 मध्ये प्रदर्शित झालेला ल्डायरी ऑफ अ बटरफ्लाय’ हा तिचा अखेरचा चित्रपट. लग्नानंतर तिचे दर्शन मोठ्या पडद्यावर झालेले नाही. त्यामुळे बाळंतपणानंतर ती बॉलिवूडमध्ये परतणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)