उदापूरमध्ये बिबट्याने पाडला शेळी फडशा

ओतूर – जुन्नर तालुक्‍यातील उदापूरच्या अमूपमळ्यात सोपान नारायण अमूप यांची शेळीला बिबट्याने त्यांच्या घरासमोरील बंदिस्त गोठ्यातून मंगळवारी (दि. 21) रात्री एकच्या दरम्यान उचलून 500 मीटर दूर अंतरावर ओढ्यात नेऊन ठार केले. त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उदापूर परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्‌यांमुळे येथील शेतकरी दहशतीखाली जगत आहेत. घटनास्थळी ओतूर वनविभागाचे वनपाल विशाल अडागळे आणि उदापूरचे वनरक्षक एस. ऐ. राठोड यांनी पंचनामा केला. ओतूर, उदापूर, डिंगोरे या भागात सततचा बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरा लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
तसेच मंगळवारी (दि. 21) रात्री साडे आठच्या दरम्यान ओतूर जवळील कोळमाथ्याच्या कॅनोलजवळ अज्ञात वाहनाने बिबट्याच्या पिल्लाला धडक दिली. त्यात पिल्लू जागीच ठार झाले परंतु बिबट्याच्या मादीने त्या पिल्लाला तोंडात धरून ऊसाच्या शेतातओढत नेले. त्याचा शोध ओतूर वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)