उदापुरला शिबिरात ग्रामस्थांना कायदेविषयक मार्गदर्शन

ओतूर- उदापूर (ता.जुन्नर) येथे आय.एल.एस. विधी महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने ग्रामपंचायत-उदापूर येथे परिसरातील लोकांच्या हितासाठी मोफत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. बुधवारी (दि. 16) साडेचार वाजता विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिर सभागृहात शिबिर पार पडले असून याचा ग्रामस्थांनी लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती करून या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या शिबिरात (माहितीचा अधिकार कायदा)-शार्दुल देशपांडे, (भेट सरपंच निवडणूक) -आशिष चौधरी, (कौटुंबिक हिंसाचार प्रतिबिंब कायदा)-भाग्येषा कुरणे, (हिंदू वारसा हक्क कायदा)- मनोज अग्रवाल, (7/12 उतारा)-विशाल गटकळ, (शिक्षणाचा अधिकार)-धनंजय झडे, (भूसंपादन कायदा)-पवन सावंत, (ज्येष्ठ नागरीकांचा हक्क कायदा)-भूषण शेटे या विषयांवर ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर प्रा. ज्ञानेश्वर केंद्रे यांनी कायदेविषयक मदत आणि उपस्थित ग्रामस्थांचे शंकानिरसन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन भागवत यांनी केले. या कार्यक्रमास प्रियंका चौधरी, सागर गर्जे, सुनील वसावे, गोपाल मात्रे या विद्यार्थ्यांनी आणि कायदेविषयक माहिती केंद्रप्रमुख डॉ. सुवर्णा निलख तसेच प्राचार्य वैजयंती जोशी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरास सरपंच प्रमिला शिंदे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबनराव कुलवडे, ग्रामपंचायत सदस्या डॉ. पुष्पलता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मोहन वल्हवणकर, विनोद भोर, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप आरोटे, संतोषकुमार होनराव, ऍड. शिवसेना विभागप्रमुख संजय शेटे, प्रतिभा शेटे, जयश्री होनराव तसेच बहुसंख्येने ज्येष्ठ नागरीक व महिला वर्ग उपस्थित होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)