उदरनिर्वाहाचे मुख्य केंद्र!

मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पुणे सांस्कृतिक राजधानी तर नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्रातील या तीन प्रमुख शहरांपैकी पुण्याविषयीची माहिती पाहूया.

जगाच्या तुलनेत एकट्या भारतामध्ये सर्वाधिक युवा आहेत. यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रातील पुण्यामध्ये याचा सर्वाधिक वाटा आहे, असे म्हणू शकतो. विशेषत: शिक्षण, नोकरी यांसाठी देशातील नागरिकांसह महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिकही पुण्याची निवड करतात. मुंबई महानगरापासून पुणे तीन तासांच्या अंतरावर असल्याने कित्येकजण प्रतिदिन वर्षानुवर्षे येथे ये-जा करत आहेत. यांपैकी अनेकमंडळी आता निवृत्तही झाली आहेत. असे असले तरी नव्या दमाची नोकरदार मंडळी नोकरीसाठी मुंबई-पुणे असा प्रवास आजही करत आहेत.

काय म्हणाले डॉ. कलाम?
पुण्याच्या या सांस्कृतिक गोष्टींचा लाभ केवळ त्या काळापुरता न घेता सतत कसा घेता येईल याचा विचार केल्यास उत्तमच. विद्यार्थी असो वा नोकरी-व्यवसाय करणारा आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वांचीच या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धडपड चालू असते. अपेक्षित यश पदरी पडले नाही, तर काहीजण निराश होतात तर काहीजण यशाच्या वाटेवरून पुढे वेगाने मार्गस्थ होतात. या दोघांनाही मन:शांतीची नितांत आवश्‍यकता असते. त्यासाठी कोणतेही व्यसन हा उपाय होऊ शकत नाही. हे सांगण्याचे तात्पर्य हेच की आध्यात्मिक क्षेत्रांचा लाभ करून घेतला पाहिजे. तसे केल्यास जीवनाला दिशा आणि शिस्त लाभेल. देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ‘भारताच्या शिक्षणात अध्यात्माचा समावेश करा’ हे अनेकदा सांगितले आहे, हे उगाचच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे हे महाराष्ट्राचे माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील केंद्र (हब) बनले आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. बंगळुरू, हैद्राबाद, चेन्नई या आयटी हब बनलेल्या शहरांच्या पंगतीत पुणे ही ऐटीत विराजमान झाले आहे. राज्याच्या महसूलात आयटी क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे एकट्या पुण्याकडून राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल नक्कीच घसघशीत आहे, यात दुमत नाही. आयटी क्षेत्रासह उद्‌पादन (प्रोडक्‍शन) क्षेत्रातील कंपन्यांचाही विस्तार येथे झाला आहे. यामुळे विशेषता राज्यातील अनेक मंडळींसाठी पुणे हे उदरनिर्वाहाचे मूलभूत साधन आहे, असे म्हणता येते. आयटी क्षेत्राचा विस्तार प्रतिदिन वाढत आहे आणि भविष्यातही तो अधिक वाढणार आहे. त्यामुळे पुण्यामध्ये याविषयी अनेक संधी निर्माण होतील, हे वेगळे सांगायला नको.

या शहरामध्ये आयटी क्षेत्राने भक्‍कमपणे पाय रोवले आहेत. असे असले तरी राज्याची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणूनही या शहराकडे पाहिले जाते. विशेषता येथील मानाच्या पाच गणपतींसह काढण्यात येणाऱ्या विसर्जन मिरवणुका लक्षवेधी असतात. हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या वेळी काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रांचाही सहभाग आहे. पारंपारिक पद्धतीने काढण्यात येणाऱ्या या दोन्ही मिरवणुका संस्कृती-परंपरा यांची ओळख करून देतात.

आषाढी एकादशीच्या आधी सुमारे 20 दिवस आळंदीहून ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून, तर देहु येथून संत तुकाराम महाराजांची पालखी दिंडीबरोबर चालत पंढरपूरसाठी निघते. या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्‍वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखीही सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना होते. संत भूमी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत या पालख्यांना असलेले महत्त्व अवर्णनीय आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागलेले असते. पुणे कितीही बदलले तरी यात बदल होणार नाही.

– जयेश राणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)