उदयनराजे स्वाभिमान दाखवा अन्‌ भाजपमध्ये या !

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकरांनी दिले निमंत्रण : उमेदवारीसाठी प्रयत्न करणार 

सातारा, दि.8( प्रतिनिधी )- राष्ट्रवादीकडून छत्रपतींच्या वंशजांची ज्या प्रकारे अवहेलना केली जात आहे ते पाहता खा. उदयनराजेंनी आता स्वाभिमान दाखवाव आणि भाजप मध्ये यावे, असे निमंत्रण माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिले. तसेच ते भाजपमध्ये आले तर उमेदवारी मिळवून देण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी येळगावकर यांनी दिली.

-Ads-

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना येळगावकर म्हणाले, राष्ट्रवादीकडून खासदार उदयनराजेंची आणि छत्रपतींच्या वंशांजांची अवहेलना केली जात आहे. पुण्यातील बैठकीत त्यांना आठ दिवसांनी भेटायला या असे सांगितले जाते. हे पाहता उदयनराजेंनी आता स्वतःचा फारसा अपमान करून घेऊ नये. राष्ट्रवादीत खा. उदयनराजे वगळता कोणी बंडखोरी केलीच नाही का? असा प्रश्न उपस्थित करून येळगावकर म्हणाले, उदयनराजेंवर आता खऱ्या अर्थाने भूमिका जाहीर करण्याची वेळ आली असून त्यांनी स्वाभिमान दाखवून भाजपमध्ये यावे. त्यांच्या उमेदवारीबाबत बोलायचे झाले तर यापूर्वी मुख्यमंत्री व पत्नी या खा. उदयनराजेंनी आयोजित कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये आले तर उमेदवारी मिळू शकणार आहे व आपणही त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असे येळगावकर यांनी सांगितले.

मात्र, खा. उदयनराजेंना खरेच मोठे व्हायचे असेल तर त्यांनी थोडे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याच बरोबर सोबत असलेली ती एक व्यक्ती चुकीचे वातावरण निर्माण करीत आहे. त्या व्यक्तीला आता हाकलून दिले पाहिजे, असा सल्ला एक जवळचा मित्र म्हणून त्यांना देत आहे. कारण, माझ्या एवढी श्रद्धा व त्याग त्यांच्यासाठी कोणी केला नसेल. त्यांच्यासाठी माझी विधानसभेची निवडणूक सोडून दुपारी साताऱ्यात आलेलो मी मनुष्य आहे. आज पर्यंत त्यांचा इतरांनी खूप फायदा घेतला मात्र मी एक पै चा देखील फायदा घेतला नाही, त्यामुळे मला सांगण्याचा व बोलण्याचा अधिकार आहे, असे ही येळगावकर यांनी सांगितले.

What is your reaction?
111 :thumbsup:
57 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)