उदयनराजे सोडता कोणीच पैलवान नाही

File Photo..

श्रीनिवास पाटील यांच्यासमोरच शरद पवार यांची कोटी
सातारा-  राष्टृवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यात असले की एरव्ही पक्षविरोधी राजकीय गप्पा मारणारे खासदार उदयनराजे भोसले पवारांची हटकून भेट घेतात. गुरुवारी सुध्दा उदयनराजे काही पैलवान मंडळींसमवेत पुन्हा शासकीय विश्वामगृहावर पोहोचले. इतक्‍या कार्यक्रमाच्या व्यस्ततेतही पवारांनी राजेंची भेट घेतली.

तिथेही पवारांनी चांगलीच मिश्‍किली केली.इथे मला उदयनराजे सोडले तर कोणीच पैलवान वाटत नाही अशी गुगली पवारांनी टाकताच हशा तर उसळलाच पण श्रीनिवास पाटील व उदयनराजे भोसले योगायोगाने आमनेसामने राहिल्याने राजकीय कोटी पण साधली गेली.

-Ads-

कोरेगावातही डीपी भोसले कॉलेजच्या उद्‌घाटन कार्यक्रमानंतर पवारांची शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णेच्या बंगल्यात राजकीय खलबते रंगणार होती. मात्र मुसळधार पावसाने राजकीय खल करण्यात अडचणी आल्या. वेळेचा रागरंग बघून पवारांनी दोनच मिनिटे कोरेगावात निवडक लोकांची भेट घेत सरळ पुण्याचा रस्ता धरला. त्यामुळे कोरेगावच्या राजकारणाला रंग चढलाच नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)