उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सातारा: राष्ट्रवादीकडून छत्रपतींच्या वंशजांची ज्या प्रकारे अवहेलना केली जात आहे ते पाहता उदयनराजेंनी आता स्वाभिमान दाखवाव आणि भाजप मध्ये यावे, असे निमंत्रण नुकतेच पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी उदयनराजेंना दिले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही गटातून उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध आहे. दरम्यान, उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले असल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादीने राज्यातील 48 पैकी 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्‍चित करण्याच्या दृष्टीने शनिवारपासून मुंबई येथील कार्यालयात बैठकांचे आयोजनास सुरूवात केली होती. रविवारी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित बैठकीला शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा निर्णय घेण्यासंदर्भात बैठक सुरू झाली. यावेळी शिवेंद्रराजेंचे समर्थक व सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध केला. त्यावेळी माझे इतरही पक्षात मित्र असल्याचा इशारा उदयनराजेंनी दिला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)