उदयनराजे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणविसांचे निमंत्रण

मुंबई : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्य सरकारच्या कामगिरीला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने एका खासगी वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी संवाद साधला. त्योळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदयनराजे भोसले हे खासदार आहेत. पण त्यांना 2019 साली पुन्हा उमेदवारी द्यायला राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा विरोध आहे. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत याचे पडसाद उमटले होते.सातारा जिल्ह्यातील एक गट त्यांच्या विरोधात आहे. विशेष म्हणजे सातारा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाच खा. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीस विरोध आहे. त्याच बरोबर विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाचा त्यांच्या नावाला विरोध आहे.

या पार्श्‍वभूमीवर खा.उदयनराजे भोसले यांना नकारण्याची कोणतीही प्रतिक्रीया पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप दिली नाही. मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकी नंतर उदयनराजेंनी आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले होते. मात्र, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही उदयनराजे यांनी सांगितले. परंतू, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी या बैठकीनंतर दिला होता.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास अनेक नेत्यांनी विरोध केला होता. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली होती. त्या नंतर वातावरण वादळापूर्वीच्या शांततेत आहे. सातारा येथे शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी खा.भोसले यांना सर्व पक्षांनी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे असे सांगून शिवसेनेचा त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे संकेत दिले होते. तर आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी ही हा मतदार संघ सध्या त्यांच्या वाट्याला असल्याने आरपीआयच्या निवडणूक चिन्हावर उमेदवारी देण्याची तयारी दाखवली होती.

या पार्श्‍वभूमीवर 7 ऑक्‍टोबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक झाल्यानंतर लगेचच 9 ऑक्‍टोबरला उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे संकेत खा. उदयनराजेंनी दिले. मात्र साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसला आव्हान दिले. आपल्यापेक्षा जास्त मते पडलेला उमेदवार दाखवा, आपण त्याचा प्रचार करू अशा शब्दात त्यांनी सुनावले होते. आपण सर्वांचेच लाडके आहोत पण पवारांचे जरा जास्तच लाडके असल्यामुळे भीती वाटते असा टोलाही त्यांनी लगावला होता.

आज मुख्यमंत्री फडणविस यांनी त्यांचे भरतीय जनता पक्षात स्वागत असल्याच्या वक्तव्याने खा.भोसले कोणती भूमिका घेतात या बाबत पुन्हा एकदा उत्सुकता लागलून राहीली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)