उदयनराजेंनी आमच्या पक्षात यावं , आम्ही त्यांना निवडून आणू- रामदास आठवले

मुंबई: सातारा लोकसभा निवडणुकीचे तिकीट नेमकं कोणाला मिळणार यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. खासदार उदयनराजेंच्या निमित्ताने राज्यात बहुचर्चित झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्यावरून राष्ट्रवादीच्या बैठकीत रामराजे निंबाळकर व आमदार शिवेंद्रराजे यांच्या गटाने विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजेंना ऑफर दिली आहे. “सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास रिपाई कडून लढावं” असे आठवलेंनी म्हटले आहे.

-Ads-

आठवले पुढे म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या जागी श्रीनिवास पाटील यांना तिकीट मिळू शकते. त्यामुळे उदयनराजेंनी आमच्या पक्षात यावं आम्ही त्यांना निवडून आणू, असेही आठवले म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
4 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)