उदयनराजेंची भुमिका ही ओठात एक अन्‌ पोटात एक

आ. शिवेंद्रसिंहराजे यांची टीका:लोकसभेबाबत शरद पवार निर्णय घेतील तो मान्य
सातारा, दि.13
सातारा लोकसभा उमेदवारीबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना छेडले असता ते म्हणाले, मी दिल्लीत जाण्यापेक्षा मी माझ्या सातारा-जावली मतदारसंघातच ठिक आहे. त्यापेक्षा साताऱ्यातील शुक्रवार पेठेतून नगरसेवक होईल. लोकसभेच्या उमेदवारीबाबत शरद पवार सर्व आमदारांना विश्वासात घेवून योग्य निर्णय घेतील. जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान खा. उदयनराजेंची भुमिका ही ओठात एक अन्‌ पोटात एक अशी असते अशी बोचरी टिका आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
सातारा पालिकेतील हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांनी सातारा लोकसभा उमेदवारीवरून अनेक प्रश्न विचारले असता आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आम्ही आपले साताऱ्यातच बरे आहोत. दिल्लीत जाण्यापेक्षा मी साताऱ्यातील शुक्रवार पेठेतून नगरसेवक होईन. मी सातारा-जावली मतदारसंघातच बरा आहे. येथूनच मी आमदार होईन, मला खासदार होण्याची इच्छाही नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते सर्व आमदारांचे मत घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. श्री. पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाढदिवसानंतर खासदार उदयनराजेंचा तुम्हाला फोन आला होता का, यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, त्यानंतर एकदाही त्यांचा फोन आला नाही किंवा त्यांची भेट झालेली नाही. इथेही नाही आणि बाहेरही ते मला भेटले नाहीत. अमिताभ बच्चनला साताऱ्यात आणून पालिकेतील स्वच्छ कारभार दाखवायचा होता का, तरीही बच्चन साताऱ्यात का आले नाहीत, या प्रश्नावर ते म्हणाले, मी काय अभिषेक बच्चन नाही, बच्चन का? आले नाहीत हे सांगायला असा टोलाही त्यांनी लगावला.
रयत शिक्षण संस्थेवर राजघराण्यातील एकातरी व्यक्तीला सदस्य म्हणून नियुक्त करायला हवे होते. मला न घेता आ. शिवेंद्रसिंहराजेंना घेतले असते तरी चालले असते. असे विधान खा. उदयनराजेंनी केले होते. यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आम्हाला त्या संस्थेवर जाण्यात रस नाही. मागून पदे घेत नाही. मला रयतच्या पदाची गरज नाही. आमच्या संस्था आमच्यासाठी खूप आहेत. उदयनराजे जरी मला घ्यावे असे म्हटले असले तरी त्यांची भुमिका ही ओठात एक अन्‌ पोटात एक अशीच असते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)