उदयनराजेंकडून माझ्या जिवाला धोका:रामराजे

खासदारकीची निवडणूक लढवण्याचेही संकेत
फलटण, दि. 2 (प्रतिनिधी) – विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील वाद काही नवीन नाही. हे दोघेंही एकमेकांविरोधात बोलण्याची एकही संधी दवडत नाहीत. आज फलटण येथे एका झालेल्या कार्यक्रमात रामराजे यांनी खासदार उदयनराजेंकडून आपल्या जीविताला धोका असल्याचे मत व्यक्त केले. तसेच जिल्ह्याचा विकास म्हणावा तितका झाला नसल्याने मला आता खाली जायचे नाही तर वर जायचे आहे असे म्हणत दिल्लीला जावेच लागेल, असा सूचक वक्तव्य करुन खासदारकीला उभे राहण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
खा. उदयनराजे व ना. रामराजे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेवीवेट नेते आहेत. मात्र, या दोघांमधून अनेक दिवसांपासून विस्तव पण गेलेला नाही. गेल्या अनेक दिवसांत दोघांनी एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी फलटणमध्ये येऊन तुमच्या घरी यायला सुद्धा वेळ लागणार नाही, असा जणू रामराजेंना दमच दिला होता. यावर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सातारा येथे जाऊन मी कोणत्याही गोष्टी विसरलो नाही. वेळ आलेवर शिकार करणारच, असे ठणकावून सांगितले होते.तर, सध्या उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीचा कोणच नेता अथवा कार्यकर्ता खासदारकी लढवा असे म्हणत नाही. मात्र, इतर सर्वच पक्ष खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्यास तयार आहेत. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. मात्र, विधानपरिषद सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र उघडपणे भूमिका घेतल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)