उत्सुकता भविष्याची…(26 मार्च ते 1 एप्रिल 2017 पर्यंतचे ग्रहमान)

अनिता केळकर 

शुक्र, हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात गुरू वक्री, भाग्यात शनी, मंगळ, प्लुटो, दशमात केतू, लाभात नेप्चून तर व्ययात रवी व बुध वक्री आहे. व्यवसायात प्रगतीसाठी महत्वाचे निर्णय घ्याल, कामाचा ताण वाढेल, मिळालेल्या संधीचे सोने करण्याची धडपड राहील. आर्थिक चणचण भासेल.

मेष : कार्यक्षमता वाढवावी
व्यवसायात प्रगतीसाठी काही ठोस पावले उचलाल. कामात कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक पाडाल. अर्थप्राप्तीचांगली होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. मनाप्रमाणे कामे होतील. कामात प्रसंगावधान दाखवाल. बेकारांना नवीन संधी चालून येईल. महिलांना मनःस्वास्थ्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. तरूणांचे विवाह होतील. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
शुभ दिनांक : 26,27,28,29,30

वृषभ : खर्चावर नियंत्रण ठेवा
व्यवसायात व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्याल. जुनी येणी वसुलीकडे लक्ष केंद्रित कराल. अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीत महत्वाचे पत्र व्यवहार होतील. कामात कल्पकता दाखवाल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा फायदा निर्णय घेताना होईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. शुभकार्यात वेळ चांगला जाईल. विद्यार्थ्यांना प्रगतीकारक.
शुभ दिनांक : 26,27,28,29,30,31

मिथुन : मानसिक आरोग्य उत्तम राहील
मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग कराल. ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. अनपेक्षित लाभ होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. तुमच्या कामामुळे तुमची पत व प्रतिष्ठा वाढेल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे नवीन कामाची संधी मिळेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. मानसिक आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : 26,27,28,29,30, 31

कर्क : कामात सातत्य टिकवावे
व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित अचूक आखलेत तरच फायदा होईल. कामात सातत्य टिकवावे लागेल. परिस्थितीशी जमवून घेतलेत तर वेळ व शक्ती खर्च होणार नाही. नोकरीत मनाविरूद्ध काम करावे लागले तरी मनावर संयम ठेवून वागावे लागेल. खर्च खुप होईल. त्यामुळे अनावश्‍यक खर्च करू नका. महिलांनी वादाच्या मुद्यांपासून चार हात लांब राहणे चांगले. प्रकृतीची काळजी घ्यावी. बोलतांना सावधगिरीने बोलावे. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे.
शुभ दिनांक : 27,28,29,30,31,1

सिंह : कामे मार्गी लागतील
व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. योग्य वेळी महत्वाचे निर्णय घेऊन प्रगती कराल. तुमचे अंदाज खरे ठरतील. आर्थिकमान सुधारेल. नोकरीत शुभ घटना घडतील. रेंगाळलेले प्रश्‍न व कामे मार्गी लागतील. मनाची उमेद व उत्साह वाढेल. विशेष लाभ होतील. महिलांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना चांगली बातमी कळेल. स्वास्थ्य उत्तम राहील. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 26,29,30,31,1

कन्या : कामाचे फळ मिळेल
सध्या गुरू, शुक्र, शनी, रवी इ. ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभल्याने प्रत्येक बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामाचे फळं आता मिळेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. नोकरीत नवीन जबाबदारी स्वीकाराल. प्रवास घडेल. हितचंतकांची मदत होईल. महिलांना प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांनी कामात कल्पकता दाखवावी. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा. यश मिळेल.
शुभ दिनांक : 26,27,28,29

तूळ : प्रश्‍न मार्गी लागतील
व्यवसायात नोकरीत सकारात्मक दृष्टीकोन फार उपयोगी पडेल. इतरांना न जमणारी कामे हाती घेऊन यश मिळवाल. रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लावाल. आर्थिक देणी देता येतील. जुनी येणी वसुल होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कौतुकास पात्र अशी कामगिरी हातून घडेल. कौटुंबिक स्वास्थ्य महिलांना उत्तम लाभेल. नोकरी करणाऱ्या महिलांना सुसंगती लाभेल. सामाजिक कार्य कराल. तरूणांचे विवाह जमतील.
शुभ दिनांक : 26,27,28,29,30

वृश्चिक : संधीचा फायदा घ्याल
तुमची जिद्द व आत्मविश्‍वास हा वाखाणण्याजोगा असे. व्यवसायात भाग्यवर्धक घटना घडतील. नवीन कार्यक्षेत्र निवडून मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा करून घ्याल. नोकरीत कामाचा उरक पाडाल. नावलौकिक मिळवाल. परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल. कामानिमित्ताने नवीन मित्र जोडले जातील. महिलांना कामाचा हुरूप येईल. स्वास्थ्य लाभेल. नवीन खरेदीचे मनसुबे साकार होतील. तरूणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान.
शुभ दिनांक : 26,27,28,29,30,31,1

धनु : धावपळ करावी लागेल.
व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा. खर्चाचे प्रमाण वाढेल. अर्थप्राप्ती चांगली झाली. तरी पैशाची आवक जावक सारखी राहील. नवीन कामे मिळवताना दगदग धावपळ करावी लागेल. कामात बेफिकीर राहून चालणार नाही. नोकरीत शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेऊन बोलावे. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. नोकरदार महिलांनी मनाची एकाग्रता साधून कामे करावीत. महिलांनी ताण न वाढता घरातील कामे करावीत.
शुभ दिनांक : 26,29,30,31,1

मकर : प्रगतीचा आलेख चढता राहील
व्यवसायात महत्वाची कामे मार्गी लागल्याने मनावरचा ताण दूर होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. प्रगतीचा आलेख चढता राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ नवीन प्रशिक्षणासाठी संधी देतील. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. महिलांना मुलांकडून प्रगतीच्या बातम्या समजतील. नोकरदार महिलांना कामात छान यश मिळेल.
शुभ दिनांक : 27,28,31, 1

कुंभ :सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगती
धैर्य व चिकाटीने व्यवसायात यश संपादन करू शकाल. ग्रहमानाची साथ उत्तम मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पैशाची स्थिती चांगली राहील. नोकरीत स्वतःचे काम करून इतरांनाही कामात मदत कराल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. महिलांना सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगतीपथावर राहता येईल. आरोग्य चांगले राहील. तरूणांनी अतिसाहस करू नये.
शुभ दिनांक : 26,29,30

मीन : चुकीचे निर्णयांकडे दुर्लक्ष करू नये
“शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या म्हणीचा उपयोग व्यवसायात होईल. ग्रहमानाची फारशी साथ नसली तरी कामात यश मिळवाल. हितचिंतकांची मदत घेऊन कामे हातावेगळी कराल. पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत. याकडे विशेष लक्ष द्याल. महिलांनी वादविवाद टाळावेत. सहनशिलता बाळगून संघर्ष टाळावा. प्रकृतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी व तरूणांनी नाचरेपणा करू नये.
शुभ दिनांक : 26,27,28,29,30,31,1


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)