उत्सुकता भविष्याची…(19 ते 25 मार्च 2018 पर्यंतचे ग्रहमान)

अनिता केळकर

मेषेत हर्षल कर्केत राहू, तूळेत गुरु वक्री, धनूमध्ये शनी, मंगळ, प्लुटो मकरेत केतू, कुंभेत नेप्चून तर मीनेत रवी, बुध, शुक्र आहेत. आनंद द्विगुणीत करणारी चांगली बातमी कळेल. मनाप्रमाणे कामे होतील. कामाचे व कष्टाचे चीज होईल. पैशाची स्थिती साधारणच राहील. तरीही समाधानी रहाल.

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल
द्विगुणीत करणारी चांगली बातमी कळेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. अचानक धनलाभाची शक्‍यता. नोकरदारांना वरिष्ठांकडून व सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. परदेशगमनास उत्तम संधी चालून येईल. सणासुदीच्या खरेदीच्या गडबडीत महिलांचा वेळ जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रियजन, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल.
शुभ दिनांक : 20,21,22,23,24,25

 वृषभ : यश हमखास मिळेल
व्यवसायात फायदा मिळवण्यासाठी ओळखीचा उपयोग करून कामाचा विस्तार कराल. खेळत्या भांडवलासाठी बॅंका, पतपेढी यांची मदत घ्याल. नोकरीत सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व सहकारी व वरिष्ठांना कळेल. महिलांनी कामाचा ताण न घेता खुषीने इतरांकडून कामे करून घ्यावीत. यश हमखास मिळेल.
शुभ दिनांक : 19,22,23,24,25

मिथुन : महत्त्वाचे करार होतील
तुमच्या मनातील इच्छा- आकांक्षा फलद्रुप झाल्याने तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. व्यवसायात यशाची कमान उंचावत जाईल. नोकरदार व्यक्तींना वेगळ्या कामाच्या निमित्ताने जादा भत्ते व सवलती मिळतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना मानसन्मान मिळतील. नवीन जागा, वाहन, वास्तू खरेदी कराल.
शुभ दिनांक : 19,20,21,24,25

कर्क : खर्च वाढेल
व्यवसायात कल्पकता व व्यवहार चातुर्य यामुळे उलाढाल चांगली राहील. नवीन पद्धतीची कामे तुम्हाला विशेष आकर्षित करतील. नोकरदार व्यक्तींना कामात उत्तम कामगिरी बजावल्याचा आनंद मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांचा वेळ घरात नवीन खरेदी व गृहसजावट यात जाईल. खर्च वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी जाण घेऊ नये. तरुणांचे साहस बळावेल.
शुभ दिनांक : 19,20,21,22,23

सिंह : कामानिमित्ताने प्रवास
ग्रहमानाची साथ असल्याने कामाचा झपाटा राहील. व्यवसायात नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहाल. अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी पार पडाल. केलेल्या कामातून आनंद मिळेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांचा वेळ आवडत्या छंदात मजेत जाईल. प्रकृतीमानही उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल.
शुभ दिनांक : 20,21,22,23,24,25

 कन्या : सलोख्याने वागा
आर्थिक बाबतीत चोखंदळ रहाल. पैशाचे व्यवहार करताना कर्तव्य श्रेष्ठ मानाल. व्यवसायात तात्पुरता नफा न बघता भविष्यात फायदा मिळेल. अशा कामांवर लक्ष केंद्रीत कराल. पैशाची ऊब चांगली मिळेल. ती वाढवण्यासाठी प्रयत्न्‌ कराल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मदत करतील ही अपेक्षा करू नका. सलोख्याने वागा. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी. झेपेल तेवढेच काम हाती घ्यावे. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस.
शुभ दिनांक : 19,22,23,24,25

तूळ : नवीन अनुभव येतील
स्वत:चे वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न राहील. पैशाचे बजेट कोलमडेल. व्यवसायात जुनी देणी द्यावी लागतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत मनाविरुद्ध कामे करावी लागतील. तरी जिभेवर साखर ठेवून इतरांशी बोलावे. महिलांचा वेळ नको त्या कामात जाईल. मुलांकडून मात्र चांगली बातमी कळेल. नवविवाहितांना अपत्यसुखाची चाहूल लागेल. तरुणांचे विवाह जमतील. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतील.
शुभ दिनांक : 20,21,24,25

वृश्चिक : प्रकृतीमान उत्तम राहील
व्यवसायात तुमच्या गुणांना वाव देणारे पूरक ग्रहमान लाभल्याने कामाचा मोबदला चांगला मिळेल. बॅंका, हितचिंतकांची मदत मिळाल्याने कामांना गती येईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत इतरांना न जमणारे काम सोपवले जाईल. त्यात यशश्री खेचून आणाल. तुमचे महत्त्व इतरांना कळून येईल. महिलां संसारिक जीवनात आनंदाची बातमी कळेल. कौटुंबिक प्रश्‍न धसास लागतील.
शुभ दिनांक : 19,22,23

धनु : संधी पुन्हा मिळेल
महत्त्वाकांक्षा जागृत करणारे ग्रहमान लाभल्याने व्यवसायात हातून निसटलेली संधी पुन्हा मिळवाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामात आवश्‍यक ते फेरफार कराल. कमी श्रमात जास्त फायदा मिळवून आर्थिक बाजू भक्कम कराल. नवीन कामे मिळतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सवलती देतील. कामाचा हुरूम वाढता राहील. महिलांचा भावनेच्या भरात अवाजवी खर्च होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
शुभ दिनांक : 19,20,21,24,25

मकर : अपेक्षा करू नका
माणसांची पारख करावी लागेल. खुबीने वागून त्यांचाच योग्य उपयोग करून घ्याल. व्यवसायात वेळेचे गणित पाळलेत तर उलाढाल वाढेल व फायदा होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यतत्पर रहा. बाजारातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवा व त्यानुसार धोरण ठरवा. नोकरीत पुढे पुढे करून कामे स्विकारू नका. कुवत ओळखा. अपेक्षाभंग होण्यापेक्षा कोणाकडून कुठलीही अपेक्षा करू नका. चंगल्या बातमीने महिलांना आनंद मिळेल. कौतुकाची थाप मिळेल.
शुभ दिनांक : 19,20,21,22,23

 कुंभ : पाहुण्यांची ये-जा राहील
सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अडथळे निर्माण झाल्याने तुम्हाला निराशा येईल व पावले चुकीच्या मार्गाने पडण्याची भीती वाटेल. तरी विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात पैशाच्या मोहमयी वातारणापासून दूर रहा. तत्वानुसार वागून कामे करा. हितचिंतकांची मदत घ्या. आर्थिकबाबतीत समाधान मिळेल. नोकरीत ताण-तणाव असला तरी वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. सणाच्या धांदलीत महिलांचा वेळ कसा जाईल हे कळणार नाही.
शुभ दिनांक : 19,20,21,22,23,24

मीन : विद्यार्थ्यांना यशदायक
“जैसी करनी वैसी भरनी’ ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात चुकीच्या सल्याने नुकसान होण्याची शक्‍यता. आर्थिक बाबतीत चोखंदळ राहा. पैशाचा अतिमोह टाळा. नोकरीत अयोग्य संगतीपासून दूर रहा. वरिष्ठांनी दिलेल्या आश्‍वासनांना भुलून नवीन जबाबदारी स्विकारू नका. “आपले काम आपण बरे’ हे धोरण ठेवा. महिलांनी भावनेच्या भरात कुठलेच निर्णय घेऊ नयेत. “दिसते तसे नसते’ हेही लक्षात ठेवावे. तरुणांनी गडबडीने वागू नये. विद्यार्थ्यांना यशदायक.
शुभ दिनांक : 19,20,21,22,23,24


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)